<font face="mangal" size="3">कोविड-19 विनियामक पॅकेजच्या समाप्तीनंतरचे अॅ - आरबीआय - Reserve Bank of India
कोविड-19 विनियामक पॅकेजच्या समाप्तीनंतरचे अॅसेट वर्गीकरण व उत्पन्न ओळख
आरबीआय/2021-22/17 एप्रिल 7, 2021 सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश) महोदय/महोदया, कोविड-19 विनियामक पॅकेजच्या समाप्तीनंतरचे अॅसेट वर्गीकरण व उत्पन्न ओळख माननीय सर्वोच्च न्यायालयाने, स्मॉल स्केल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन विरुध्द युओआय व इतर ह्या व इतर प्रकरणांमध्ये मार्च 23, 2021 रोजी त्याचा निर्णय पारित केला आहे. ह्या संबंधात खालीलपणे सांगण्यात येत आहे. (I) ‘व्याजावरील व्याज’चा परतावा/समायोजन (2) सर्व कर्जदायी संस्था1 वरील निर्णयाला अनुसरुन, मोराटोरियम कालावधीत, म्हणजे मार्च 1, 2020 ते ऑगस्ट 31, 2020 दरम्यान त्यांनी कर्जदाराला आकारलेल्या ‘व्याजावरील व्याज’ चा परतावा/समायोजन करण्यासाठी त्यांच्या संचालक मंडळाने मंजुर केलेले धोरण ठेवतील. सर्व कर्जदायी संस्थांकडून वरील निर्णयाची अंमलबजावणी अक्षरशः व एकसमानतेने केली जाण्याची खात्री करुन घेण्यासाठी, निरनिराळ्या सुविधांसाठीच्या परताव्याच्या/समायोजनाच्या रकमेचे गणन करण्याची रीत, इंडियन बँक्स असोशिएशन (आयबीए) कडून इतर उद्योग/औद्योगिक संस्थांशी विचार विनिमय करुन निश्चित केली जाईल आणि ती रीत सर्व कर्जदायी संस्थांकडून अनुसरली जाईल. (3) परिपत्रक परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.47/21.04.048/2019-20 दि. मार्च 27, 2020 आणि डीओआर. क्र. बीपी. बीसी.71/21.04.048/2019-20 दि. मे 23, 2020 (‘कोविड-19 विनियामक पॅकेज’) अन्वये, मोराटोरियम कालावधीत कार्यकारी भांडवल सुविधा घेतलेल्या कर्जदारांसह - मग त्यांनी पूर्णतः किंवा अंशतः घेतलेले असो किंवा घेतलेले नसो - सर्व कर्जदारांना वरील मदत/सहाय्य लागु असेल. (4) मार्च 31, 2021 रोजी संपणा-या वर्षासाठी, कर्जदायी संस्था, त्यांच्या वित्तीय विवरणपत्रांमध्ये वरील सहाय्यावर आधारित, त्यांच्या कर्जदारांबाबत परतावा/समायोजन करावयाची एकूण रक्कम प्रकट करतील. (II) अॅसेट वर्गीकरण (5) वरील निर्णयाच्या अनुपालनानुसार, सर्व कर्जदायी संस्थांनी, त्यांच्या कर्जदारांच्या खात्यांचे अॅसेट वर्गीकरण, खाली स्पष्ट केल्यानुसार विद्यमान सूचनांनुसार केले जात राहील. (1) कोविड-19 विनियामक पॅकेज अनुसार कोणतेही मोराटोरियम दिले न गेलेल्या खात्यांच्या बाबतीत, करावयाचे अॅसेट वर्गीकरण हे, महापरिपत्रक - अग्रिम राशींसंबंधीच्या उत्पन्न ओळख, अॅसेट वर्गीकरण व तरतुदीकरण ह्यावरील प्रुडेंशियल नॉर्म्स दि. जुलै 1, 2015 नुसार किंवा कर्जदायी संस्थांच्या विशिष्ट वर्गाला लागु असलेल्या इतर संबंधित सूचनांनुसार केले जाईल (आयआरएसी नॉर्म्स) (2) कोविड-19 विनियामक पॅकेजनुसार मोराटोरियम दिले गेले असलेल्या खात्यांच्या बाबतीत, मार्च 1, 2020 ते ऑगस्ट 31, 2020 दरम्यानच्या कालावधीसाठीचे अॅसेट वर्गीकरण हे, परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.71/21.04.048/2019-20 दि. मे 23, 2020 सह वाचित, परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.63/21.04.048/2019-20 दि. एप्रिल 17, 2020, अनुसार नियंत्रित केले जाईल. सप्टेंबर 1, 2020 पासूनच्या कालावधी साठी अशा सर्व खात्यांसाठीचे अॅसेट वर्गीकरण हे लागु असलेल्या आयआरएसी नॉर्म्स अनुसार केले जाईल. आपला विश्वासु, (मनोरंजन मिश्रा) 1 वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका, व प्रादेशिक ग्रामीण बँकांसह), प्राथमिक (नागरी) सहकारी बँका/जिल्हा केंद्रीय सहकारी बँका, अखिल भारतीय वित्त संस्था, व बिगर बँकीय वित्तीय कंपन्या (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह) |