RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78510042

धनकोष व्यवहार कळविण्यात विलंब/चुकीचे अहवाल/धनकोष व्यवहार न कळविणे आणि धनकोषातील शिल्लकांमध्ये अपात्र असलेल्या रकमा समाविष्ट करणे ह्यासाठी दंडात्मक व्याज लावण्यावरील महानिदेश

आरबीआय/डीसीएम/2017-18/59
महानिदेश डीसीएम (सीसी) क्र.जी- 2/03.35.01/2017-18

ऑक्टोबर 12, 2017

1. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
(धनकोष असलेल्या सर्व बँका)

2. कोषागार संचालक
(राज्य सरकारे)

महोदय/महोदया,

धनकोष व्यवहार कळविण्यात विलंब/चुकीचे अहवाल/धनकोष व्यवहार न कळविणे आणि धनकोषातील शिल्लकांमध्ये अपात्र असलेल्या रकमा समाविष्ट करणे ह्यासाठी दंडात्मक व्याज लावण्यावरील महानिदेश

आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 खालील प्रस्तावनेनुसार आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ अनुसार, आमचे स्वच्छ नोटा धोरण प्रसृत करण्याबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, ही बँक, मार्गदर्शक तत्वे/सूचना देत असते. हे प्रयत्न सातत्याने राहावेत आणि धनकोषांमधील व्यवहारांचा अहवाल वेळेवारी व बिनचुक देण्यासाठी बँकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आम्ही ह्या विषयावरील सूचना दिल्या आहेत.

(2) सोबत दिलेल्या महानिदेशांमध्ये ह्या विषयावरील अद्यावत केलेली मार्गदर्शक तत्वे/परिपत्रके समाविष्ट करण्यात आली आहेत. नवीन सूचना दिल्या जातील तेव्हा हे महानिदेश वेळोवेळी अद्यावत केले जातील.

(3) हे महानिदेश आरबीआयच्या वेबसाईटवरही www.rbi.org.in टाकण्यात आले आहेत.

आपली विश्वासु,

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत - वरील प्रमाणे


जोडपत्र

(1) धनकोष व्यवहारांचे अहवाल विलंबाने पाठविणे/चुकीचे अहवाल पाठविणे/अहवाल न पाठविणे ह्यासाठी दंडात्मक व्याज

(1.1) धनकोष व्यवहारांचे अहवाल पाठविणे

धनकोषामध्ये ठेवण्याची/त्यातून निकासी करण्याची किमान रक्कम रु.1,00,000/- व त्यानंतर रु.50,000/- च्या पटीत असेल.

(1.2) अहवाल पाठविण्यासाठी कालमर्यादा

(1.2.1) धनकोषांनी, कोणत्याही परिस्थितीत, त्यांचे सर्व व्यवहार, त्याच दिवशी 9 वाजेपर्यंत, आयसीसीओएमएस मार्फत, सुरक्षित वेबसाईटद्वारे (एसडब्ल्युएस), त्यांच्या संबंधित लिंक ऑफिसेसना कळवावेत. लिंक ऑफिसेसनी, कोणत्याही परिस्थितीत, त्याच दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत, एकत्रित केलेली स्थिती, त्यांच्या इश्यु ऑफिसेसना कळवावी.

(1.2.2) उप-कोषागार कार्यालयांनी (एसटीओ) त्यांचे सर्व व्यवहार, थेट रिझर्व बँकेच्या इश्यु ऑफिसला, त्याच दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत कळवावेत.

(1.2.3) बँकेमधील संपकाळाच्या बाबतीत सवलत/शिथिलता

सर्वसामान्य/विशिष्ट संपाच्या परिस्थितीत, अहवाल पाठविण्याबाबतच्या शिथिलीकरणाचा विचार प्रकरण-निहाय केला जाईल.

(1.3) विलंबांसाठी दंडात्मक व्याजाची आकारणी

(1.3.1) धनकोष व्यवहार कळविण्यात विलंब झाल्यास, धनकोष ठेवणा-या बँकेकडून येणे (इश्यु) असलेल्या रकमेवर, विलंब कालासाठी, ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 3 मध्ये दिलेल्या दराने दंडात्मक व्याज आकारले जाईल. हे दंडात्मक व्याज टी + 0 धर्तीवर काढले जाईल. म्हणजे, लिंक ऑफिसने, इश्यु ऑफिसला त्याच कामाच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत न कळविलेल्या व्यवहारांबाबत दंडात्मक व्याज आकारले जाईल. तथापि, रिझर्व बँकेला तसे वाटल्यास, दंडात्मक व्याज आकारण्या संबंधाने सुयोग्य सवलत काळ दिला जाऊ शकतो.

(1.3.2) मंडळाच्या इश्यु विभागाशी थेट जोडणी असलेल्या एकल धनकोष/एसटीओंच्या बाबतीत, चेस्ट स्लिप्स सादर करण्यास विलंब झाल्यावरही दंडात्मक व्याज आकारले जाईल.

(1.4) चुकीचे अहवाल आणि दंडात्मक व्याज आकारणी

चुकीचे अहवाल पाठविल्या जाण्याच्या सर्व प्रकरणात, चुका दुरुस्त केलेला अहवाल, रिझर्व बँकेला मिळण्याच्या तारखेपर्यंत, त्याच प्रकारे दंडात्मक व्याज आकारले जाईल. बँकांच्या चालु खात्यांमधील क्रेडिट्स/डेबिट्स हे, लिंक ऑफिस विवरणपत्रामधील आकड्यांवर आधारित असल्याने, चेस्ट स्लिप्समध्ये योग्य रिपोर्टिंग केले असले तरीही, लिंक ऑफिस विवरणपत्रांमध्ये चुकीचे रिपोर्टिंग केलेल्या सर्व प्रकरणांमध्ये दंडात्मक व्याज आकारले जाईलच. संबंधित धनकोषांनी कळविलेले आकडे खरे असल्याची खात्री करुन घेणे, लिंक ऑफिसेसकडून अपेक्षित आहे. धनकोषांमध्ये केलेली नव्या नोटांची/नोटांची प्रेषणे, लिंक ऑफिस विवरणपत्रात ‘ठेवी’ व्यवहार म्हणून कळविण्यात येणार नाहीत ह्याची विशेष काळजी घेतली जावी.

(1.5) मळक्या नोटांची प्रेषणे आरबीआयला कळविणे/अन्य धनकोषात पाठविणे

आरबीआयला केलेली/अन्य धनकोषात पाठविलेली मळक्या नोटांची प्रेषणे, धनकोषांनी/लिंक ऑफिसेसनी निकासी म्हणून दाखवू नये. अशी प्रेषणे चुकीनेही ‘निकासी’ म्हणून कळविली गेल्यास, त्या प्रेषणाचे कितीही मूल्य असले तरी आणि असे चुकीचे रिपोर्टिंग करण्याचा कालावधी कोणताही असला तरी, रु.50,000/- दंड आकारला जाईल.

(1.6) आयसीसीओएमएस मधील वळविलेल्या रकमा कळविणे

आयसीसीओएमएस मधील वळविलेली रकमा कळविण्याबाबत, त्या स्तंभ 2 अ व 4 अ मध्ये कळविल्या जाव्यात. म्हणजे, बनविलेली रक्कम (डायव्हर्शन) प्राप्त करणा-या कोषाने चेस्ट स्लिपच्या स्तंभ 2 अ खाली कळवावे आणि प्रेषण करणा-या कोषाने, ती रक्कम चेस्ट स्लिपच्या स्तंभ 4 अ मध्ये विनाविलंब दाखवावी. त्याच बँकेच्या धनकोषामध्येही वळविलेल्या रकमा (डायव्हर्शन्स) ‘निकासी’ व ‘ठेवी’ स्तंभात (म्हणजे 4ई व 2ई मध्ये हे स्तंभ चलन हस्तांतरण व्यवहारांसाठी आहेत) कळविल्या जाऊ नयेत.

(1.7) आकारावयाचे कमाल दंडात्मक व्याज

चुकीच्या विलंबाने पाठविलेल्या अहवालासाठी आकारावयाच्या दंडात्मक व्याजाच्या कमाल रकमेसाठी कोणतीही अट नाही. धनकोषाचे व्यवहार वेळेवर व बिनचुकपणे कळविले जावेत हाच उद्देश असल्याने, लागु असलेल्या सर्व प्रकरणात दंडात्मक व्याज वसुल केले जाईल - मात्र संबंधित व्यवहाराची/दंडात्मक व्याजाची रक्कम कितीही असो - मात्र दंडात्मक व्याज जवळच्या रुपयापर्यंत राऊंड ऑफ केले जाईल.

(2) धनकोषामधील शिल्लकांमध्ये अपात्र रकमांचा समावेश केला गेल्यास दंडात्मक व्याज

(2.1) धनकोषांचे चुकीचे अहवाल/विलंबित अहवाल/व्यवहार न कळविणे ह्यामुळे, रिझर्व बँकेमधील चालु खात्यात त्यांनी ‘अपात्र’ क्रेडिट मिळविले असल्याच्या सर्व प्रकरणांमध्ये दंडात्मक व्याज आकारले जाईल. धनकोषातील/प्रेषणामधील त्रुटी, धनकोषातील शिल्लक/प्रेषणे ह्यामध्ये आढळून आलेल्या चो-या/अफरातफर/नकली नोटा ह्या बाबतीतही विद्यमान ‘दंड-योजने’ नुसार दंडात्मक कारवाई/उपाय योजले जातील.

(2.2) ह्याशिवाय, केवळ संयुक्त रक्षकांच्या रक्षणाखाली असलेली व त्यांना ‘मुक्तपणे उपलब्ध असलेली’ रोकडच धनकोषातील शिल्लकेत समाविष्ट केली जाण्यास पात्र आहे. अशा प्रकारे, कोणत्याही कारणाने सील बंद लिफाफ्यात, सुरक्षित रक्षणासाठी ठेवलेली रोकड/संयुक्त रक्षक सोडून अन्य कोणत्याही अधिका-यांनी कुलुपबंद अशा पेटीत/डब्यात ठेवलेली रोकड किंवा संयुक्त रक्षकाच्या दोन कुलुपांव्यतिरिक्त एखाद्या अधिका-याने अतिरिक्त कुलुप लावून ठेवलेली रोकड, धनकोष शिल्लकेमध्ये समाविष्ट केली जाण्यास पात्र असणार नाही. अशा रकमा कोषा शिल्लकांमध्ये समाविष्ट केल्या गेल्यास, ते चुकीचे रिपोर्टिंग समजले जाईल आणि ते परिच्छेद 3 मध्ये दिलेल्या दंडात्मक कारवाईसाठी पात्र असेल.

(2.3) वरील सर्व प्रकरणांमध्ये (कोष शिल्लका/प्रेषणे ह्यातील त्रुटी, चोरी/अफरातफर, कोष शिल्लकांमध्ये प्रेषणांमध्ये नकली नोटा आढळणे सोडून), कोष शिल्लकांमध्ये ‘अपात्र’ रकमा समाविष्ट करण्याच्या तारखेपासून ते त्या रकमा कोष शिल्लकांमधून काढून टाकल्या जाण्याच्या तारखेपर्यंत दंडात्मक व्याज आकारले जाईल. धनकोष/प्रेषणे ह्यातील त्रुटी, तसेच कोष प्रेषणे ह्यातील चोरी/अफरातफर, खोट्या नोटा आढळणे ह्यामुळे आलेल्या तुटींसाठीही विद्यमान ‘दंड योजने’ नुसार दंडात्मक उपाय योजले जातील.

(3) दंडात्मक व्याजाचा दर

अहवाल पाठविण्यातील विलंब/चुकीचे अहवाल/अहवाल न पाठविणे/धनकोष शिल्लकांमध्ये अपात्र रकमा समाविष्ट केल्या जाणे ह्यांच्या कालावधीसाठी, विद्यमान बँका व्याजदरापेक्षा 2% अधिक व्याज आकारले जाईल.

(4) कोषगारांच्या धनकोषांबाबत दंडात्मक व्याजाची आकारणी

कोषागार/उप-कोषागार येथील धनकोषांनाही वरील सूचना लागु असतील.

(5) सादरीकरणे

(5.1) विलंबाने अहवाल सादर करण्याबाबत दंडात्मक व्याज लावण्याचा एकमेव निकष, विलंबाचे दिवस हाच असल्याने, रिझर्व बँकेच्या ह्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबाबत बँकांनी विनंती करण्याचे कारणच नाही. तथापि, विशेषतः डोंगराळ/दूरस्थ भागातील धनकोष आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेले धनकोष संबंधित इश्यु ऑफिसकडे, त्यांच्या मुख्य/नियंत्रक ऑफिसांमार्फत, संबंधित बँकांच्या खात्यांमध्ये डेबिट केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत त्यांचे सादरीकरण करु शकतात.

(5.2) चुकीचे अहवाल पाठविण्याबाबत दंड फेटाळून लावण्यासाठीची सादरीकरणे विचारात घेतली जाणार नाहीत (वरील परिच्छेद 1(ई) शी तुलना करा).

(5.3) त्वरित/सुयोग्य अहवाल पाठविले जाण्याची शिस्त बँकांमध्ये निर्माण करणे हाच उद्देश दंडात्मक व्याज लावण्यामागे असल्याने, विलंबित/चुकीचे अहवाल/अहवाल न पाठविणे ह्यामुळे रिझर्व बँकेचा निधी वापरला जात नाही किंवा सीआरआर/एसएलआर मध्ये त्रुटीही येत नाहीत किंवा कारकुनी चुका, अहेतुपूर्वक किंवा गणिती चुका, ही पहिलीच चूक आहे. कर्मचारी अनुनभवी आहेत इत्यादि कारणे दंड फेटाळून लावण्यासाठी बँकांनी दिल्यास, ही कारणे/विनंत्या दंड फेटाळण्यासाठी वैध कारणे म्हणून समजली जाणार नाहीत. ह्याशिवाय, ह्या सर्व त्रुटींचा आम्ही गांभीर्याने विचार करु.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?