<font face="mangal" size="3px">रोकड व्यवस्थापन बाहेरुन करविणे - व्यवहारांच - आरबीआय - Reserve Bank of India
रोकड व्यवस्थापन बाहेरुन करविणे - व्यवहारांचा मेळ
आरबीआय/2018-19/183 मे 14, 2019 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/ महोदय/महोदया, रोकड व्यवस्थापन बाहेरुन करविणे - व्यवहारांचा मेळ ऑक्टोबर 4, 2016 रोजीच्या चलन विषयक धोरण निवेदनाच्या परिच्छेद 15 मध्ये दिल्यानुसार, खजिन्याची/रोख रकमेची ने-आण करण्याबाबतच्या सुरक्षेच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेण्यासाठी, ह्या बँकेने, चलन हालचालीवरील समिती स्थापन केली होती (अध्यक्ष - श्री. डी के मोहंती, कार्यकारी संचालक, भारतीय रिझर्व्ह बँक). संबंधित बँक, सेवादाता आणि त्यांचा पोट-कंत्राटदार (एटीएम मध्ये कॅश भरणे) ह्यामधील व्यवहारांचा वेळेवारी असलेला मेळ ह्याबाबत ह्या समितीने केलेल्या शिफारशी तपासण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बँकेने पुढील प्रक्रिया अनुसरावी असे ठरविण्यात आले आहे. (अ) चेस्ट/नोडल शाखा ह्यांच्याशी सल्लामसलत करुन, सेवादात्याने त्याची कॅश इंडेंटस किमान एक दिवस आधी (टी - 1, टी हा कॅश लोडिंगचा दिवस आहे) सादर करावीत. रोख रक्कम काढण्यासाठी अनेक ठिकाणे टाळावीत व प्रत्येक केंद्रासाठी केवळ एकच ठिकाण असावे. तथापि, महानगर केंद्रासाठी रोख रक्कम काढण्यासाठी दोन केंद्रे ठेवता येऊ शकतात. (ब) बँक, सेवादाता व त्याचे पोट कंत्राटदार ह्यामधील व्यवहारांचा मेळ घालण्याचे काम किमान टी + 3 धर्तीवर केले जावे. (क) एखादा वाद, किंवा सुरक्षेचा भंग/तसा भंग करण्याचा प्रयत्न/घालून दिलेल्या कार्यरीतीचा भंग ह्याबाबत कळविण्यात आल्यास, सेवादाता व त्याचे पोट-कंत्राटदार ह्यांनी विनंती केल्यास, बँक त्यांना एटीएमचे व्हिडियो फूटेज उपलब्ध करुन देऊ शकते. (2) रोकड व्यवस्थापनासाठी बाहेरुन व्यवस्था करण्याचा एक भाग म्हणून, बँकेने तिच्या सेवादात्याला व त्याच्या पोट-कंत्राटदाराला पुढील बाबतीत प्रोत्साहन द्यावे. (अ) डेटा परत मिळविण्यासाठी व मेळ घालण्यासाठी एक सक्षम डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट प्रणाली स्थापन करणे. (ब) कर्मचा-यांची रेकॉर्ड्स निर्दोष असल्याची खात्री करुन घेण्यासाठी, स्वयं विनियामक संस्थेकडून, कोणताही अनन्य अशी रीत/संकेत ह्यामार्फत, व्यवसाय स्तरावर, कर्मचा-यांचा डेटा बेस तयार करुन ठेवण्यात यावा. आपला विश्वासु, (संजय कुमार) |