<font face="mangal" size="3px">रुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या - आरबीआय - Reserve Bank of India
रुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ
नोव्हेंबर 22, 2017 रुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ रुपी कोऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना आरबीआयने, नोव्हेंबर 22, 2017 ते मार्च 31, 2018 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी मुदतवाढ दिली आहे (निदेश डीसीबीआर.सीओ.एआयडी/डी-21/12.22.218/ 2017-18 दि. नोव्हेंबर 17, 2017 अन्वये). वरील निदेश सर्वप्रथम फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत लागु करण्यात आले होते आणि त्यांना, प्रत्येकी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी आठ वेळा, व प्रत्येकी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ह्यातील सर्वात शेवटची मुदतवाढ, ऑगस्ट 22, 2017 ते नोव्हेंबर 21, 2017 ह्या तीन महिन्यांसाठी होती. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने वरील निदेश लागु केले होते. वरील निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. रिझर्व बँकेने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत ती बँक, निर्बंधांसह बँक व्यवसाय करु शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1410 |