<font face="mangal" size="3">मार्च 31, 2017 पर्यंतचे विशेष उपाय : इमिजिएट पेमेंट स - आरबीआय - Reserve Bank of India
मार्च 31, 2017 पर्यंतचे विशेष उपाय : इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस), युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा (युएसएसडी) साठी ग्राहक-आकारांची तर्क संगती
आरबीआय/2016-17/185 डिसेंबर 16, 2016 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय/महोदया, मार्च 31, 2017 पर्यंतचे विशेष उपाय : इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस), युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा (युएसएसडी) साठी ग्राहक-आकारांची तर्क संगती रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान नोटांचे (विहित बँक नोटा - एसबीएन) वैध चलन लक्षण, परिपत्रक क्र. डीसीएम (पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016, अन्वये काढून घेतल्यानंतर, भारत सरकार, निरनिराळ्या ग्राहकांशी सल्लामसलत करुन, समाजाच्या मोठ्या घटकाद्वारे डिजिटल प्रदान प्रणालीचा अंगिकार केला जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना करत आले आहे. एक तात्पुरता उपाय म्हणून, असे ठरविण्यात आले आहे की, सर्व सहभागी बँका व प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) देणा-या संस्था, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) युएसएसडी आधारित *#99 आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालींवर केलेल्या रु.1000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी, ग्राहकांवर कोणताही आकार लावणार नाहीत. (2) वरील उपाय जानेवारी 01, 2017 पासून अंमलात येतील व मार्च 31, 2017 पर्यंत लागु असतील दरम्यानच्या कालावधीत, भारतीय रिझर्व बँक, वरील वाहिन्यांखालील आकारांचे, संबंधित ग्राहकांद्वारे पुनरावलोकन करील. (3) हे निदेश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 (2007 चा 51) च्या कलम 18 सह वाचित, कलम 10(2) खाली देण्यात येत आहेत. आपली विश्वासु (नंदा स. दवे) |