RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

131322743

भारतीय रिझर्व बँकेने परभणी डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, परभणी, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 08 जानेवारी 2025, रोजीच्या आदेशाद्वारे परभणी डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटीव  बँक  लिमिटेड, परभणी, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग नियमन अधिनियम 1949 (बीआर अधिनियम) च्या कलम 56 सह कलम 20 व कलम 26 A मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल ₹5.00 लाख (केवळ पाच लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांचे पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यव्हाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, त्यात  म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन व त्यानंतर केलेले अतिरिक्त निवेदन विचारात घेता, भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली की, इतर गोष्टींबरोबर, भारतीय रिझर्व बँकेच्या खालील निर्देशांचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

बँकेने

(i) संचालक संबंधित कर्ज मंजूर केले, आणि

(ii)  ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी ला पात्र रक्कम विहित वेळेत हस्तांतरित केली नाही.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

(पुनीत पंचोली)  
मुख्य महा प्रबंधक

प्रेस प्रकाशनी : 2024-2025/1942

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?