RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

133502743

भारतीय रिझर्व बँकेने सहयोग अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, उदगीर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 21 ऑक्टोबर 2024, रोजीच्या आदेशाद्वारे सहयोग अर्बन को-ऑपरेटीव  बँक लिमिटेड, उदगीर, महाराष्ट्र (बँक) वर, बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 26A चे उल्लंघन केल्याबद्दल ₹1.50 लाख (केवळ एक लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांवर आधारित वैधानिक तरतुदींचे उल्लंघन आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, त्यात म्हटल्याप्रमाणे, बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या तरतुदींचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता, अन्य बाबींसह, भारतीय रिझर्व बँकेला असे आढळून आले कि बँकेविरुद्धचा खालील आरोप सिद्ध होत आहे आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

बँकेने, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये, पात्र रक्कम, विहित कालावधीत हस्थांतरित  केली  नाही. 

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि या बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे. 

(पुनीत पांचोली) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2024-2025/1423

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?