RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

129693591

भारतीय रिझर्व बँकेने दि वैजापूर मर्चंट को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, वैजापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 21 ऑक्टोबर 2024 च्या आदेशाद्वारे दि वैजापूर मर्चंट को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, वैजापूर, महाराष्ट्र (बँक) वर, भारतीय रिझर्व बँकेद्वारे नागरी सहकारी बॅंकांसाठी पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क अंतर्गत (SAF)’ जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे तसेच ‘आपले ग्राहक ओळखा’ (KYC) या अंतर्गत काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹7.50 लाख (केवळ सात लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे .

31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्तिथीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी भारतीय रिझर्व बँकेद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील पर्यवेक्षी निष्कर्षांचे, भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार पालन न केल्याने आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, त्यात म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तीक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन व दिलेल्या अतिरिक्त माहितीचि चाचणी विचारात घेता, अन्य बाबींसह, भारतीय रिझर्व बँकेला असे आढळले कि, बँकेविरुद्धचे खालील आरोप सिद्ध होत आहेत आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे.

i) बँकेने, काही संस्थाना देणग्या दिल्या आहेत आणि पर्यवेक्षी कृती फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे पालन न करता स्टेट बँक ऑफ इंडियाने देऊ केलेल्या ठेवीवरच्या व्याजदरापेक्षा जास्त दराने ठेवीवर (नवीन / नुतनीकरण) व्याज देऊ केले होते.

ii) बँक, संशयास्पद व्यवहारांची प्रभावी ओळख आणि अहवाल देणारी मजबूत संगणक कार्यक्रम प्रणाली (software) ठेवण्यात अयशस्वी झाली होती.

हि कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैध्यतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पुढे, हा आर्थिक दंड लावणे हे बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईसाठी पूर्वग्रह न ठेवता आहे.

(पुनीत पंचोली)
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी : 2024-2025/1388

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?