RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

104383792

भारतीय रिझर्व्ह बँकेने इसलामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इसलामपूर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

10 ऑगस्ट 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने इसलामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इसलामपूर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 03 ऑगस्ट 2023 रोजीच्या आदेशाद्वारे इसलामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इसलामपूर, (महाराष्ट्र) (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 26A च्या तरतुदी आणि ‘भारतीय रिझर्व्ह बँक Know Your Customer(KYC) दिशानिर्देश, 2016’ आणि ‘ठेव खात्यांची देखभाल-यूसीबी’ मधील काही तरतुदींचे चे पालन न केल्यामुळे 2 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायदा कलम 46(4)(i) आणि 56 सह वाचलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की, बँकेने डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये पात्र रक्कम हस्तांतरित केलेली नाही आणि आपल्या विद्यमान ग्राहकांच्या जोखीम वर्गीकरणाचा नियतकालिक आढावा तसेच निष्क्रिय खात्यांचे वार्षिक पुनरावलोकन केले नाही. त्याच पुढे, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँकेला त्यात नमूद केल्याप्रमाणे वैधानिक तरतुदी आणि जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेने दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/733

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?