<font face="mangal" size="3">कार्ड प्रेझेंट व्यवहारांसाठी आधार-आधारित सê - आरबीआय - Reserve Bank of India
कार्ड प्रेझेंट व्यवहारांसाठी आधार-आधारित सत्यांकन
आरबीआय/2016-17/170 डिसेंबर 02, 2016 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/ महोदय/महोदया, कार्ड प्रेझेंट व्यवहारांसाठी आधार-आधारित सत्यांकन आमचे परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.892/02.14.003/2016-17, दि. सप्टेंबर 29, 2016 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. त्यात बँकांना सांगण्यात आले होते की त्यांनी, जानेवारी 1, 2017 पासून अंमलात/उपयोगात आणलेल्या, कार्ड प्रेझेंट अॅक्सेप्टन्सच्या सर्व नवीन यंत्रणा/सोयी, आधार आधारित बायोमेट्रिक सत्यांकन वापरुन केलेल्या प्रदान व्यवहार करण्यास सक्षम असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. (2) आमच्या असे नजरेस आणण्यात आले आहे की, आधार-आधारित साधनांची मागणी व पुरवठा जुळत नसल्याकारणाने अशा स्वीकार-यंत्रणा बसविण्याचा/कार्यान्वित करण्याचा दर/प्रमाण कमी झाले आहे. ह्यासाठी, आढावा घेतल्यानंतर, अशा आधार-आधारित साधने कार्यान्वित करण्याची मुदत जून 30, 2017 पर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, वरील सूचनांचे अनुसरण करण्यासाठी, बँका, होस्ट-एंड, नेटवर्क स्तर आणि साधन तयार असणे ह्या बाबींसह आवश्यक त्या व्यवस्था करणे सुरु ठेवू शकतात. (3) ह्याशिवाय, येथे स्पष्ट करण्यात येते की, आमच्या सप्टेंबर 29, 2016 च्या परिपत्रकातील सूचना, नवीन कार्ड स्वीकार यंत्रणा/साधने कार्यान्वित करण्यासाठी आहेत. आधार आधारित बायोमेट्रिक सत्यांकन वापरुन करावयाच्या प्रदान व्यवहार प्रक्रियेसाठी असलेली विद्यमान कार्ड स्वीकार साधने सक्षम करण्यासाठीचा कालावधी पुढे कळविण्यात येईल. (4) हे निदेश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 च्या (2007 चा 51) कलम 18 सह वाचित, कलम 10(2) खाली देण्यात आले आहेत. (5) कृपया ह्या परिपत्रकाची पोच द्यावी. आपली विश्वासु, (नंदा एस दवे) |