<font face="mangal" size="3">अभ्युदय महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., चन्नाप& - आरबीआय - Reserve Bank of India
अभ्युदय महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., चन्नापत्ना, कर्नाटक ह्यांचेवर दंड लागु
जून 5, 2018 अभ्युदय महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., चन्नापत्ना, कर्नाटक ह्यांचेवर दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, अभ्युदय महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., चन्नापत्ना, कर्नाटक ह्यांचेवर रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला असून, हा दंड ‘संचालक नातेवाईक व त्यांचे हितसंबंध असलेल्या संस्था/कंपन्या ह्यांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशी’ ह्यावरील, रिझर्व बँकेचे परिपत्रक क्र.बीपीडी.पत्रक.50/13.05.00/2002-03 दि. एप्रिल 29, 2003 मधील परिच्छेद 3 मध्ये दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले असल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने वैय्यक्तिक सुनावणी केली होती. ह्या प्रकरणातील सत्य व वरील बँकेने ह्याबाबत दिलेले सादरीकरण विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने झाली असल्याने त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3182 |