<font face="mangal" size="3">नाण्यांचा स्वीकार</font> - आरबीआय - Reserve Bank of India
नाण्यांचा स्वीकार
आरबीआय/2017-18/132 फेब्रुवारी 15, 2018 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/ महोदय, नाण्यांचा स्वीकार नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा ह्या विषयावरील आमचे महापरिपत्रक डीसीएम(एनई)क्र.जी -1/08.07.18/2017-18 जुलै 3, 2017 च्या परिच्छेद 1(ड) चा कृपया संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, कोणत्याही बँक-शाखेचे, काऊंटरवर सादर केलेल्या, छोट्या मूल्याच्या नोटा, आणि/किंवा नाणी स्वीकारण्यास नकार देऊ नये. तथापि, बँक शाखांकडून नाणी स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी रिझर्व बँकेकडे येतच आहेत. ही सेवा देण्यास बँक शाखांनी नकार दिल्या गेल्याने, दुकानदार, छोटे व्यापारीही विकलेल्या मालाच्या बदल्यात नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याने, सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे. ह्यासाठी आपणास पुनश्च सांगण्यात येते की, आपण आपल्या सर्व शाखांना खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून देण्यासाठी त्यांच्या काऊंटर्सवर सादर केलेली सर्व मूल्याची नाणी स्वीकारण्यास ताबडतोब सांगावे. (2) विशेषतः, रु. 1 व रु. 2 मूल्यांची नाणी वजनावर स्वीकारणे सोयिस्कर ठरेल. तथापि, पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये प्रत्येक 100 नाणी असलेल्या पिशव्या स्वीकारणे, रोखपाल व ग्राहक ह्या दोघांसाठीही सोयिस्कर ठरेल. जनतेच्या माहितीसाठी वरील आशयाची नोटिस शाखेच्या कार्यालयात तसेच कार्यालयाच्या बाहेरही प्रदर्शित केली जावी. (3) शाखांमध्ये नाणी साठविण्याबाबतचे प्रश्न टाळण्यासाठी, विद्यमान कार्यरीतीनुसार, नाणी धनकोषाकडे पाठविली जावीत. धनकोषांमध्ये अशा प्रकारे साठलेली नाणी पुनर् प्रसारणासाठी वापरता येतील. मागणी नसल्यामुळे, नाण्यांचा साठा, धनकोषाच्या धारण क्षमतेपेक्षा अधिक झाल्यास, ती नाणी पाठविण्यासाठी, त्या मंडळाच्या इश्यु विभागाशी संपर्क साधावा. (4) शाखांना अचानक भेट देऊन, ह्याबाबत केल्या जाणा-या अनुपालनाचा अहवाल मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यास नियंत्रक कार्यालयांना सांगण्यात यावे. मुख्य कार्यालयात ह्या अहवालांचा आढावा घेऊन, आवश्यक तेथे, ताबडतोब उपायात्मक कारवाई केली जावी. (5) ह्याबाबत अनुपालन न केले गेल्यास, ते भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन समजले जाईल व त्यासाठी वेळोवेळी लागु असलेली दंडात्मक कारवाई केली जाईल. (6) कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु, (उमा शंकर) |