<font face="mangal" size="3"> नाण्यांचा स्वीकार करणे</font> - आरबीआय - Reserve Bank of India
नाण्यांचा स्वीकार करणे
आरबीआय/2018-19/223 जून 26, 2019 व्यवस्थापकीय संचालक महोदय/महोदया, नाण्यांचा स्वीकार करणे वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम (आरएमएमटी) क्र. 2945/11.37.01/2017-18 दि. फेब्रुवारी 15, 2018 आणि नोटा व नाणी बदलून देण्याचा सुविधेवरील आमचे महापरिपत्रक डीसीएम (एनई) क्र.जी-2/08.07.18/2018-19 दि. जुलै 2, 2018 च्या (जानेवारी 14, 2019 रोजी अद्यावत केलेले) परिच्छेद 1(ड) कडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. त्यात सांगण्यात आले होते की, कोणत्याही बँक शाखेने त्यांच्या काऊंटर्सवर सादर केलेल्या छोट्या मूल्याच्या नोटा आणि/किंवा नाणी स्वीकारण्यास नकार देऊ नये. (2) तथापि, शाखांकडून नाणी स्वीकार करण्यास नकार दिल्या गेल्याच्या व त्यामुळे जनतेला मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी रिझर्व बँकेकडे अजूनही येतच आहेत. (3) ह्यासाठी आपणास पुनश्च सांगण्यात येते की, आपण आपल्या सर्व शाखांना ताबडतोब कळवावे की त्यांनी त्यांच्या काऊंटर्सवर, व्यवहारांसाठी किंवा बदलण्यासाठी सादर केलेल्या सर्व मूल्याच्या नाण्यांचा स्वीकार करुन ह्याची कडक अंमलबजावणी होत असल्याची खात्री करुन घ्यावी. आपला, (अजय मिचयारी) |