पीएमजेडीवाय खालील खाती - सावधगिरी
आरबीआय/2016-17/165 नोव्हेंबर 29, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, पीएमजेडीवाय खालील खाती - सावधगिरी कृपया, रोख रक्कम काढणे - साप्ताहिक मर्यादा वरील आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी) क्र.1424/10.27.00/2016-16 दि. नोव्हेंबर 25, 2016 चा संदर्भ घ्यावा. पीएमजेडीवायचे निष्पाप शेतकरी व ग्रामीण खातेदारांना, काळा पैसा पांढरा करणा-यांच्या कार्यकृतींपासून व बेनामी मालमत्ता व मनी लॉडरिंग कायद्यांच्या परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी/वाचविण्यासाठी, एक सावधानतेची बाब म्हणून, नोव्हेंबर 9, 2016 नंतर, विहित बँक नोटा पीएमजेडीवाय खात्यात भरुन केलेल्या व्यवहारांवर काही मर्यादा घालण्याचे ठरविण्यात आले आहे. एक तात्पुरता उपाय म्हणून, पीएमजेडीवाय खात्यांबाबत पुढील गोष्टी अनुसरण्यास बँकांना सांगण्यात येत आहे. (1) केवायसी निकष संपूर्णपणे पूर्ण केलेल्या खातेदारांना, त्यांच्या खात्यांमधून प्रति महिना रु.10,000/- काढण्यास परवानगी दिली जावी. लागु असलेल्या विद्यमान मर्यादांमध्ये, रु.10,000 च्या वरही रोख रक्कम काढण्याची परवानगी, अशा निकासींचा खरेपणा तपासून व ते बँकेच्या रेकॉर्डमध्ये नोंदवून, बँक मॅनेजर देऊ शकतात. (2) सीमित किंवा केवायसी निकष पूर्ण न करणा-या खातेदारांना, नोव्हेंबर 9, 2016 नंतर एसबीएनद्वारे जमा केलेल्या रकमेमधून, रु. 10,000 ह्या सर्व समावेशक मर्यादेमध्ये, प्रति महिना रु.5,000 काढण्यास परवानगी आहे. आपली विश्वासु (पी विजया कुमार) |
पेज अंतिम अपडेट तारीख: