राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या भाग भांडवलाला आरबीआयची अतिरिक्त वर्गणी
जानेवारी 15, 2016 राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या भाग भांडवलाला आरबीआयची अतिरिक्त वर्गणी जानेवारी 12, 2016 रोजी, रिझर्व बँकेने, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेला(एनएचबी), भरणा केलेले भांडवल म्हणून रु.1000 कोटींची वर्गणी दिली, त्यामुळे रिझर्व बँकेचे समभाग धारण रु.450 कोटींवरुन रु.1450 कोटी झाले आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही रिझर्व बँकेची, संपूर्ण सहाय्यक संस्था असून, रिझर्व बँकेने, लेखा वर्ष 2014-15 मध्ये रु.1000 कोटींची रक्कम, भांडवली वर्गणी म्हणून एनएचबीला उपलब्ध करुन दिली होती. वित्त मंत्रालय, भारत सरकार ह्यांनी, अधिसूचना क्र.एसओ 3322(ई) दि. डिसेंबर 9, 2015 अन्वये, रिझर्व बँकेचे एनएचबीमधील भागधारण वाढविण्यासाठी, एनएचबीचे प्राधिकृत भांडवल रु.450 कोटींपासून रु.1450 कोटींपर्यंत वाढविण्याचे अधिसूचित केले होते. एनएचबी अधिनियम, 1987 खाली ठरविलेल्या वित्तीय कार्यकृतींचा विस्तार करण्यास ह्यामुळे मदत होईल. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1666 |
पेज अंतिम अपडेट तारीख: