<font face="mangal" size="3">लक्ष्मी विलास बँक व इंडिया बुल्स हाऊसिंग फाय - आरबीआय - Reserve Bank of India
लक्ष्मी विलास बँक व इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. ह्यांच्या विलीनीकरणाची घोषणा
एप्रिल 6, 2019 लक्ष्मी विलास बँक व इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. ह्यांच्या विलीनीकरणाची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेला माध्यमांच्या बातम्यांमधून कळले आहे की, लक्ष्मी विलास बँक (एलव्हीबी) आणि इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. (आयबीएचएफएल) ह्यांनी त्यांच्या संचालक मंडळांच्या मंजुरीने विलीनीकरणाची घोषणा दि. एप्रिल 5, 2019 रोजी केली आहे. माध्यमांमधील बातम्यांच्या एका भागामध्ये सांगण्यात आले आहे की, एलव्हीबीच्या संचालक मंडळांमध्ये आरबीआयचे दोन संचालक असल्याने, ह्या विलीनीकरणाला आरबीआयची अप्रत्यक्ष मंजुरी आहे. येथे स्पष्ट करण्यात येते की, ह्या विलीनीकरणाच्या घोषणेला सध्या तरी आरबीआयने कोणतीही मंजुरी दिलेली नाही. त्याचप्रमाणे स्पष्ट करण्यात येते की, एलव्हीबीच्या संचालक मंडळावर आरबीआयचे अतिरिक्त संचालक नेमले जाणे ह्याचा अर्थ, ह्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला आरबीआयची मंजुरी आहे असा नाही. ह्याशिवाय, त्या अतिरिक्त संचालकांची सभेमध्ये स्पष्टपणे निर्देशित केले आहे की, त्यांचे ह्या प्रस्तावावर कोणतेही मत नाही. ह्या संस्थांकडून प्रस्ताव आल्यावरच, विद्यमान विनियामक मार्गदर्शक तत्वे/सूचनानुसार आरबीआय त्यांची तपासणी करील. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2390 |