<font face="mangal" size="3">एप्रिल 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफ&# - आरबीआय - Reserve Bank of India
एप्रिल 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी-एमएफआयकडून आकारला जाणारा लागु असलेला सरासरी पायाभूत दर (बेस रेट)
मार्च 28, 2018 एप्रिल 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी-एमएफआयकडून आकारला भारतीय रिझर्व बँकेकडून आज कळविण्यात आले आहे की, एप्रिल 1, 2018 पासून सुरु होणा-या तिमाहीसाठी, अबँकीय वित्तीय कंपन्या - सूक्ष्म वित्त संस्था (एनबीएफसी-एमएफआय) कडून त्यांच्या कर्जदारांना आकारला जाणारा, लागु असलेला सरासरी बेस रेट 8.99 टक्के असेल. येथे स्मरण करुन देण्यात येते की, भारतीय रिझर्व बँकेने, एनबीएफसी-एमएफआयना, कर्जाचे मूल्य काढण्याबाबत दिलेल्या फेब्रुवारी 7, 2014 रोजीच्या परिपत्रकात सांगितले होते की, रिझर्व बँक, प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, एनबीएफसी-एमएफआय कडून पुढील तिमाहीत त्यांच्या कर्जदारांना आकारावयाचे व्याजदर काढण्यासाठी, पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस रेटची सरासरी कळवील. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2580 |