<font face="mangal" size="3px">जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबी - आरबीआय - Reserve Bank of India
जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी - एमएफआय ह्यांनी आकारावयाचा लाभ सरासरी बेस रेट
डिसेंबर 30, 2016 जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी - एमएफआय ह्यांनी आकारावयाचा भारतीय रिझर्व बँकेने आज कळविले आहे की, जानेवारी 1, 2017 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, अबँकीय वित्तीय कंपन्या - सूक्ष्म वित्त कंपन्यांद्वारे (एनबीएफसी - एमएफआय) आकारावयाचा लागु असलेला सरासरी बेस रेट, 9.41 टक्के असेल. भारतीय रिझर्व बँकेने, एनबीएफसी-एमएफआयना कर्जांचे मूल्य काढण्याबाबत, दि. फेब्रुवारी 7, 2014 च्या पत्रकात सांगितले होते की, प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या दिवशी, एनबीएफसी-एमएफआय द्वारा, त्यांच्या कर्जदारांना, पुढील तिमाहीमध्ये आकारावयाचा व्याजदर काढण्यासाठी, पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस रेटची सरासरी कळवील. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1714 |