अहवालांच्या मार्फत प्राधिकरणे माहितीवर जवळून देखरेख ठेवत आहेत : आरबीआय
नोव्हेंबर 12, 2016 अहवालांच्या मार्फत प्राधिकरणे माहितीवर जवळून देखरेख ठेवत आहेत : आरबीआय रिझर्व बँकेने आज स्पष्ट केले आहे की, विद्यमान रु.500 व रु.1000 च्या नोटांचा (एसबीसी) वैध चलन म्हणून असलेला दर्जा काढून घेण्याबाबत बँकांना (सहकारी बँकांना धरुन) देण्यात आलेल्या सूचनांचा एक भाग म्हणून सविस्तर माहितीची एक प्रणाली तयार करण्यात आली आहे. रिझर्व बँकेकडून असेही सांगण्यात आले आहे की, ह्या सुविधेचा गैरवापर टाळण्यासाठी, जनतेने, बँकांमध्ये (सहकारी बँकांसह) जमा केलेल्या व बदलून घेतलेल्या विशिष्ट बँक नोटांबाबत अशा रिपोर्टांमार्फत मिळालेल्या माहितीवर प्राधिकरणे जवळून देखरेख ठेवत आहेत. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1189 |
पेज अंतिम अपडेट तारीख: