2005 पूर्वी जारी केलेल्या बॅंक नोटा परत घेतल्या जाणार - रिझर्व्ह बॅंक सल्लागार
2005 पूर्वी जारी केलेल्या बॅंक नोटा परत घेतल्या जाणार - रिझर्व्ह बॅंक सल्लागार भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सूचित केले की 2005 पूर्वी जारी केलेल्या सर्व बॅंक नोटा 31 मार्च 2014 नंतर चलनातून पूर्णपणे काढून घेतल्या जातील. 1 एप्रिल 2014 पासून जनतेनी नोटा बदलण्यासाठी बॅंकांमध्ये जावे. पुढील सूचना मिळेपर्यंत बॅंका या नोटा बदलण्याची सुविधा देतील. रिझर्व्ह बॅंकेने पुढे सांगितले आहे की, जनता परत देण्याच्या या नोटा सहजपणे ओळखू शकेल कारण 2005 पूर्वी नोटांच्या मागील बाजूवर मुद्रण वर्ष लिहिले जात नव्हते. (कृपया खालील छायाचित्र पहावे). रिझर्व्ह बॅंकेने असेही स्पष्ट केले आहे की 2005 पूर्वी जारी केलेल्या नोटा वैध चलन असतील. याचा अर्थ असा की, बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांबरोबरच ग्राहक नसलेल्या व्यक्तिंनाही नोटा बदलून द्यायच्या आहेत. तथापि, 1 जुलै 2014 पासून ग्राहक नसलेल्या व्यक्तिंना 500 आणि 1000 च्या 10 पेक्षा अधिक जास्त नोटा बदलायच्या असतील, तर त्यांनी बॅंकेच्या शाखेमध्ये ओळखपत्र व निवासाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅंक जनतेला अपील करीत आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांना विनंति आहे की त्यांनी सक्रीयपणे नोटा परत देण्याच्या या प्रक्रियेत सहकार्य करावे. (अजित प्रसाद) प्रेस रिलीज: 2013-2014/1472 |
पेज अंतिम अपडेट तारीख: