<font face="mangal" size="3">बेसेल 3 भांडवली विनियम : डेट म्युच्युअल फंड/ईएफ - आरबीआय - Reserve Bank of India
बेसेल 3 भांडवली विनियम : डेट म्युच्युअल फंड/ईएफटी बाबतची वर्तणुक
आरबीआय/2020-21/18 ऑगस्ट 6, 2020 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, बेसेल 3 भांडवली विनियम : डेट म्युच्युअल फंड/ईएफटी बाबतची वर्तणुक कृपया बेसेल 3 भांडवली विनियमांवरील आमचे परिपत्रक डीबीआर.क्र.बीपी.बीसी.1/21.06.201/2015-16 दि. जुलै 1, 2015 चा संदर्भ घ्यावा. (2) ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 8.4.1 अनुसार, इक्विटीज्साठीचा भांडवली आकार म्युच्युअल फंडांच्या युनिट्सना देखील लागु आहे. आता असे ठरविण्यात आले आहे की (1) केंद्रीय, राज्य व विदेशी केंद्रीय सहकारांचे बाँड्स (2) बँकेचे बाँड्स व (3) कॉर्पोरेट बाँड्स (बँक बाँड्स सोडून अन्य) ह्यांच्या स्वरुपात, डेट म्युच्युअल फंड/एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) ह्यामध्ये गुंतवणुक करणा-या बँका, मार्केट जोखमीसाठीचा भांडवली आकार पुढीलप्रमाणे काढतील : (अ) संपूर्ण कॉन्स्टिट्युअंट कर्ज माहिती उपलब्ध असलेल्या डेट म्युच्युअल फंड/ईटीएफ मध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी, साध्य असल्यानुसार 9% सर्वसाधारण मार्केट जोखीम आकार लागु असेल. निरनिराळ्या प्रकारच्या एक्सपोझर्स साठीचे विशिष्ट जोखीम भांडवली आकार खाती दिल्यानुसार लागु असतील.
(ब) वरील कर्ज संलेखांचे मिश्रण असलेल्या डेट म्युच्युअल फंड/ईटीएफच्या बाबतीत मात्र, विशिष्ट जोखीम भांडवली आकार हा, सर्वात कमी दर्जा असलेला कर्ज संलेख/त्या फंडातील सर्वोच्च विशिष्ट भांडवली आकार असलेला संलेख ह्यावर आधारित काढला जाईल. (क) कॉन्स्टिट्युएंट कर्ज माहिती, किमान प्रत्येक महिना अखेर उपलब्ध नसलेल्या डेट म्युच्युअल फंड/ईटीएफ ह्यांना, बेसेल 3 भांडवली विनियमांवरील महापरिपत्रकाच्या परिच्छेद 8.4.1 मध्ये विहित केल्यानुसार, मार्केट जोखमीसाठी भांडवली आकाराचे गणन करण्यासाठी, इक्विटी समान (अॅट पार) वर्तणुक दिली जाईल. आपला विश्वासु, (सौरव सिन्हा)
|