RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78513083

बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बिदर, कर्नाटक - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

सप्टेंबर 3, 2019

बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बिदर, कर्नाटक - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस)
कलम 35 अ खालील सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जाते की, बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बिदर, कर्नाटक, ह्यांना फेब्रुवारी 21, 2019 रोजी देण्यात आलेल्या निर्देशांचा कार्यकाल वाढविणे जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बिदर, कर्नाटक, ह्यांना देण्यात आलेले व ऑगस्ट 31, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले, फेब्रुवारी 21, 2019 रोजीचे निर्देश वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, म्हणजे, सप्टेंबर 1, 2019 ते फेब्रुवारी 29, 2020 पर्यंत त्या बँकेला लागु असतील.

संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/595

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?