RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506594

सार्वजनिक क्षेत्रातील बँका/वित्तीय संस्थांसाठी द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिन स्पर्धा - (2016-17) - नोंदणीसाठी आवाहन

ऑक्टोबर 11, 2017

सार्वजनिक क्षेत्रातील बँका/वित्तीय संस्थांसाठी द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिन स्पर्धा - (2016-17) - नोंदणीसाठी आवाहन

हिंदी भाषेच्या (राजभाषा) वापर प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका व वित्तीय संस्थांसाठी एक द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिन स्पर्धा आयोजित करत असते. सर्व पीएसबी/एफआयना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी, सोबत दिलेला नमुना भरुन, एप्रिल 1, 2016 ते मार्च 31, 2017 दरम्यान त्यांनी प्रसिध्द केलेल्या द्वैभाषिक/हिंदी हाऊस मॅगॅझिनच्या प्रत्येकी सहा प्रती पाठवाव्यात. ह्या हाऊस मॅगॅझिन्सचे मूल्यांकन/निर्णय, एका मूल्यमापन समितीकडून केले जाईल व भारतीय रिझर्व बँकेचा राजभाषा विभाग, विजेत्याला शील्ड/प्रमाणपत्रे देईल.

नोंदणीची शेवटची तारीख नोव्हेंबर 6, 2017 आहे.

नोंदणी पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे :

प्रभारी उप महाव्यवस्थापक,
भारतीय रिझर्व बँक,
राजभाषा विभाग, केंद्रीय कार्यालय,
सी-9, दुसरा मजला, बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स,
बांद्रा (पूर्व), मुंबई – 400051

ह्या स्पर्धेचे निकष जोडपत्र ‘अ’ मध्ये दिले आहेत. नोंदणी करण्यासाठीचा नमुना जोडपत्र ‘ब’ मध्ये दिला आहे.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/999

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?