<font face="mangal" size="3">प्राधीकृतता प्रमाणपत्राचे रद्दीकरण - मेसर्ì - आरबीआय - Reserve Bank of India
प्राधीकृतता प्रमाणपत्राचे रद्दीकरण - मेसर्स बीम मनी प्रा. लि.
मे 4, 2017 प्राधीकृतता प्रमाणपत्राचे रद्दीकरण - मेसर्स बीम मनी प्रा. लि. प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, पुढील पेमेंट सिस्टिम ऑपरेटरचे (पीएसओ) प्राधिकृतता प्रमाणपत्र (सीओए), त्या कंपनीने स्वेच्छेने स्वाधिकृतता परत/सादर केल्यामुळे रद्द केले आहे.
हे सीओए रद्द करण्यात आल्यानंतर, वरील कंपनी प्रिपेड कार्ड देण्याचा व्यवसाय करु शकत नाही. तथापि, एक पीएसओ म्हणून, मेसर्स बीम मनी प्रा. लि. ह्यांचेवर वैध दावा (असल्यास) असलेले ग्राहक किंवा व्यापारी, ह्या रद्दीकरण तारखेच्या दोन वर्षांच्या आत, म्हणजे 3-5-2019 पर्यंत, त्यांच्या संबंधित दाव्यांच्या तडजोडीसाठी वरील कंपनीकडे जाऊ शकतात. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2981 |