<font face="mangal" size="3">नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करुन, बँकिंग &# - आरबीआय - Reserve Bank of India
नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करुन, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) खाली, तिचे सहकारी सोसायटीत रुपांतरण - दि सोजित्रा को.ऑपरेटिव बँक लि. जिल्हा आणंद (गुजराथ)
फेब्रुवारी 15, 2017 नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करुन, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) खाली, तिचे सहकारी सोसायटीत रुपांतरण - दि सोजित्रा को.ऑपरेटिव बँक लि. जिल्हा आणंद (गुजराथ) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँकेने, आदेश दि. जानेवारी 23, 2017 अन्वये, दि सोजित्रा को.ऑपरेटिव बँक लि., जिल्हा आणंद (गुजराथ) ह्यांचा परवाना रद्द केला आहे. आर्थिक स्थिती व अनुपालन ह्यांचे अभिलेख असामाधानकारक असल्याचे विचारात घेता, वरील बँकेला, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या व्याप्ती बाहेर जाण्यास व तिचे एका सहकारी सोसायटीमध्ये रुपांतरण करण्यास सांगण्यात आले. सोजित्रा को.ऑपरेटिव सोसायटी मध्ये रुपांतरण करण्यासाठी, वरील बँकेने, वरील अधिनियमाच्या कलम 36 (अ)(2) मधील सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 5 (सीसीआय) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील बँक ही ‘सहकारी बँक’ असणे समाप्त झाले असून, ह्या अधिनियमावरील सहकारी बँकेला लागु अशा तरतुदीही लागु असणे बंद होईल. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 22 खाली, वरील बँकेला भारतात बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 5(ब) मध्ये व्याख्या केल्यानुसार, ठेवी स्वीकारणे/परत करणे ह्यासह, ‘बँकिंग’ चा व्यवहार करण्यास वरील बँकेवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2197 |