<font face="mangal" size="3">गोकुळ को.ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्य - आरबीआय - Reserve Bank of India
गोकुळ को.ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांचा बँक व्यवसाय करण्याबाबतचा परवाना रद्द
जून 30, 2017 गोकुळ को.ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांचा बँक व्यवसाय करण्याबाबतचा परवाना रद्द जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येत आहे की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 56 सह वाचित, कलम 22 खाली, भारतीय रिझर्व बँकेने, आदेश दि. जून 20, 2017 अन्वये, गोकुळ को.ऑपरेटिव अर्बन बँक लि., 7-2-148, मोंडा मार्केट, सिकंदराबाद – 500 003 ह्यांचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे, वरील बँकेला, ठेवींचा स्वीकार/परतफेड ह्यांच्यासह, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 5(ब) मध्ये व्याख्या केल्यानुसार “बँकिंग” चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3547 |