<font face="mangal" size="3">स्पर्शरहित रीतीमधील कार्ड व्यवहार - सत्यांक - आरबीआय - Reserve Bank of India
स्पर्शरहित रीतीमधील कार्ड व्यवहार - सत्यांकनाच्या अतिरिक्त/जादा घटकाच्या आवश्यकतेत शिथिलता
आरबीआय/2020-21/71 डिसेंबर 4, 2020 अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, स्पर्शरहित रीतीमधील कार्ड व्यवहार - सत्यांकनाच्या अतिरिक्त/जादा घटकाच्या आवश्यकतेत शिथिलता कृपया भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.2163/02.14.003/2014-2015 दि. मे 14, 2015 चा संदर्भ घ्यावा. त्यात, पॉईंट्स ऑफ सेल (पीओएस) च्या ठिकाणी केलेल्या कार्ड व्यवहारांसाठी प्रति व्यवहार रु.2,000/- मूल्यापर्यंत सत्यांकनाच्या अतिरिक्त घटकाची आवश्यकता शिथिल करण्यात आली होती. त्यानंतर स्पष्ट करण्यात आले होते की, ह्या मर्यादेपलिकडील व्यवहारही स्पर्शरहित रीतीने परंतु एएफए शिवाय केले जाऊ शकतात. (2) ‘कार्ड व्यवहारांची सुरक्षितता वाढविणे’ वरील आरबीआयचे परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1343/02.14.003/2019-20 दि. जानेवारी 15, 2020 ह्याचाही संदर्भ घेण्यात यावा. त्यात युजर्सना, स्विच ऑन/ऑफ चा किंवा कार्डाच्या निरनिराळ्या लक्षणांसाठी मर्यादा निश्चित करण्याचा पर्याय, स्पर्शरहित ववहारांसह देण्यात आला होता. ऑक्टोबर 1, 2020 पासून जारी झालेल्या ह्या सूचनांमुळे, युजर्सना, त्यांच्या गरजा व सोयीनुसार, कार्ड लक्षणांचा वापर करुन आवश्यकता निश्चित करण्याचा अधिकार मिळाल्याने, कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत. (3) सध्याच्या कोविड-19 देशव्यापी साथीमुळे स्पर्शरहित व्यवहारांचे लाभ अधोरेखितच झाले आहेत. हे नजरेसमोर ठेवून व स्टेकहोल्डर्सनी दिलेल्या फीडबॅकवर आधारित, डिसेंबर 4, 2020 च्या विकासात्मक व विनियात्मक धोरणावरील निवेदनात घोषित करण्यात आले होते की, स्पर्शरहित व्यवहारांसाठीच्या, एएफए शिथिलतेसाठीची प्रति व्यवहार मर्यादा वाढविली जाईल. त्यानुसार, युजर्सना उपलब्ध असलेले पुरेसे संरक्षण देऊन ठरविण्यात आले की, प्रति व्यवहार मर्यादा, रु.5,000/- पर्यंत वाढविण्यात यावी. स्पर्शसहित किंवा स्पर्शरहित व्यवहाराची रीत वापरण्याच्या युजरच्या स्वातंत्र्यासह इतर सर्व आवश्यकता पूर्वीप्रमाणेच लागु असणे सुरुच राहील. (4) हे निर्देश, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 च्या (2007 चा अधिनियम 51) च्या कलम 18 सह वाचित कलम 10(2) खाली देण्यात आले आहेत. आणि ते जानेवारी 1, 2021 पासून जारी होतील. आपला विश्वासु, (पी. वासुदेवन) |