<font face="mangal" size="3">एटीएममधून रोकड काढणे - दैनिक मर्यादांमध्ये व - आरबीआय - Reserve Bank of India
एटीएममधून रोकड काढणे - दैनिक मर्यादांमध्ये वाढ
आरबीआय/2016-17/204 डिसेंबर 30, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, एटीएममधून रोकड काढणे - दैनिक मर्यादांमध्ये वाढ कृपया, बँक ठेव खात्यामधून रोख रक्कम काढणे - शिथिलीकरण ह्या विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1424/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 25, 2016 चा संदर्भ घ्यावा. (2) स्थितीचे पुनरावलोकन केल्यावर, प्रति दिवस, प्रति कार्ड रु.2,500/- ह्या विद्यमान मर्यादेऐवजी, जानेवारी 1, 2017 पासून ही मर्यादा रु.4,500/- प्रति दिवस प्रति कार्ड (विहित केलेल्या सर्वसमावेशक साप्ताहिक मर्यादेच्या आत) करण्यात आली आहे. ही रक्कम मुख्यतः रु.500 मूल्याच्या नोटांमध्ये असावी. (3) आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी)क्र. 1437/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 28, 2016 अनुसार असलेल्या रोख निकासीच्या मर्यादांमध्ये कोणताही बदल नाही. आपली विश्वासु (पी विजया कुमार) |