विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे –
रोख रक्कम निकासीच्या मर्यादा
आरबीआय/2016-17/142 नोव्हेंबर 21, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे – कृपया आमचे परिपत्रक क्र. डीसीएम्(पीएलजी)क्र .1274/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 14, 2016 च्या परिच्छेद (1) - अतिरिक्त सुविधाचा संदर्भ घ्यावा. त्यानुसार, चालु खातेधारकांना (तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ कार्यान्वित असलेल्या चालु खात्यांना लागु) रु.50,000 पर्यंतची रोख रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली होती. पुनरावलोकन केल्यावर, ही सुविधा, ओव्हरड्राफ्ट व कॅश क्रेडिट खात्यांनाही देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, गेले तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यान्वित असलेल्या चालु/ओव्हरड्राफ्ट/कॅश क्रेडिट खात्यांनाही आता प्रति सप्ताह रु.50,000 पर्यंत रोखीने काढता येतील. तथापि, प्रति सप्ताह निकासीची ही वाढविलेली मर्यादा व्यक्तिगत ओव्हरड्राफ्ट खात्यांना लागु असणार नाही. (2) अशा रोख निकासीसाठी मुख्यत्वेकरुन रु.2000 च्या नोटाच दिल्या जाव्यात. आपली विश्वासु, (सुमन रे) |
पेज अंतिम अपडेट तारीख: