<font face="mangal" size="3">बँक दरामधील बदल</font> - आरबीआय - Reserve Bank of India
बँक दरामधील बदल
आरबीआय/2015-16/194 सप्टेंबर 29, 2015 अध्यक्ष/सीईओ - सर्व अनुसूचित वाणिज्य बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँका/राज्य केंद्रीय सहकारी बँका (एसटीसीबी/सीसीबी) महोदय/महोदया, बँक दरामधील बदल कृपया वरील विषयावरील आमची परिपत्रके, डीबीआर क्र आरईटी बीसी.99/12.01.001/2014-15, दिनांक जून 2, 2015 आणि डीसीबीआर बीपीडी.(पीसीबी/आरसीबी) सीआयआर क्र.37/16.11.00/2014-15, दिनांक जून 2, 2015 चा संदर्भ घ्यावा. (2) चैाथे द्वैमासिक नाणेविषयक धोरण 2015-16, दिनांक सप्टेंबर 29, 2015 यात घोषित केल्यानुसार बँकांचा दर, सप्टेंबर 29, 2015 पासून, 50 बेसिस पॉईंट्सने कमी (तडजोडित) केला जाऊन 8.25 टक्क्यांपासून 7.75 टक्के करण्यात आला आहे. (3) राखीव निधी-आवश्यकतांमधील कमतरतेसाठीचे सर्व दंडात्मक व्याजदर (जे बँकदराशीच जोडलेले असतात) देखील जोडपत्रात दिल्यानुसार सुधारित केले आहेत. आपली (लिली वढेरा) बँकदराशी जोडलेले दंडात्मक व्याजदर
|