<font face="mangal" size="3">आरटीजीएसच्या टाईम विंडोमधील बदल</font> - आरबीआय - Reserve Bank of India
आरटीजीएसच्या टाईम विंडोमधील बदल
आरबीआय/2015-16/168 सप्टेंबर 1, 2015 आरटीजीएसमध्ये भाग घेणा-या बँकांचे अध्यक्ष/ महोदय/महोदया, आरटीजीएसच्या टाईम विंडोमधील बदल कृपया, भारतीय रिझर्व बँकेने, ऑगस्ट 28, 2015 रोजी दिलेल्या, ‘सप्टेंबर 1, 2015 पासून दुस-या व चैाथ्या शनिवारी बँकांची रजा :- कामकाजाच्या शनिवारीही आरबीआय तिच्या आधार-सेवा देणार’ ह्यावरील, वृत्तपत्र निवेदन क्र. 2015-2016/528 चा संदर्भ घ्यावा. (2) त्यानुसार, दुस-या व चैाथ्या शनिवारी, संपूर्ण दिवस, आरटीजीएस कार्यान्वित असणार नाही, परंतु कामकाजाच्या शनिवारी ती संपूर्ण दिवस कार्यान्वित असेल. दुस-या व चैाथ्या शनिवारी मूल्याधिष्ठित तारीख असलेल्या भविष्यातील/भावी मूल्याधिष्ठित तारखेने व्यवहारांची प्रक्रिया आरटीजीएसखाली केली जाणार नाही. (3) 1 सप्टेंबर, 2015 पासून जारी होणारी आरटीजीएस टाईम-विंडो खालीलप्रमाणे असेल.
(4) हे परिपत्रक, प्रदान व तडजोड प्रणाली अधिनियम, 2007 च्या, कलम 10(2) खाली देण्यात येत आहे. (5) कृपया पोच द्यावी. आपली नीलिमा रामटेके |