<font face="mangal" size="3">खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक - आरबीआय - Reserve Bank of India
खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक सूचना
ऑक्टोबर 26, 2016 खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक सूचना आमच्या असे नजरेस आले आहे की, जनतेमधील काही लोकांच्या भोळ्या व संशय न घेण्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन काही तत्वशून्य लोक नित्याच्या व्यवहारांदरम्यान, जास्त मूल्याच्या खोट्या/बनावट भारतीय नोटांचा प्रसार करत आहेत. आम्ही येथे जनतेला सावधानतेचा इशारा देत आहोत की त्यांनी नोटा स्वीकारण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासणी करावी. उच्च मूल्याच्या ख-या भारतीय नोटांमध्ये नक्कल विरोधी सुरक्षा लक्षणे घालण्यात आली आहेत. अशा खोट्या नोटा बारकाईने तपासणी केल्यास ओळखता येऊ शकतात. बँक नोटांमधील सुरक्षा लक्षणांवरील सविस्तर माहिती आमच्या वेबसाईटवर /en/web/rbi/rbi-kehta-hai/know-your-banknotes उपलब्ध असून, जनतेने ही लक्षणे जाणून घ्यावीत व इतरांनाही सांगावीत. नित्याचे व्यवहार करत असतांना नोटा स्वीकारण्यापूर्वी त्या नीट बघून घेण्याची सवय करुन, बनावट/खोट्या नोटा तयार करण्यास आळा घालण्याची विनंती जनतेला केली जात आहे. भारतीय रिझर्व बँक तिच्या सर्व ग्राहकांना स्मरण करुन देत आहे की, बनावट नोटा तयार करणे किंवा जवळ बाळगणे, बदलणे, स्वीकारणे, बनावट नोटा प्रसारात आणणे किंवा अशा प्रकारची कृत्ये करणे/साह्य करणे, हे भारतीय दंड संहितेखाली अपराध असून अशा गुन्ह्यांना कडक शिक्षा होऊ शकते. भारतीय नोटांचा मोठ्या संख्येने वापर होण्यासाठी अतिरिक्त ओळख-आवश्यकतां आरबीआयच्या विचाराधिन आहेत. बनावट नोटांच्या प्रसाराचा धोका काबूत आणण्यासाठी रिझर्व बँक व सार्वजनिक प्राधिकरणांना सहकार्य करावे असे आवाहन रिझर्ब बँक जनतेला करीत आहे. रिझर्व बँकेने ही नोटिस सावधानता ठेवण्यासाठी व जनतेच्या अधिकतर हितासाठी दिली आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1037 |