<font face="Mangal" size="3px">तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील सर्वसमावेशक - आरबीआय - Reserve Bank of India
तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील सर्वसमावेशक महा-निदेश
फेब्रुवारी 25, 2016 तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील सर्वसमावेशक महा-निदेश भारतीय रिझर्व बँकेने आज, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी), अँटी मनी लँडरिंग (एएमएल), दहशतवादाला वित्त सहाय्य करण्याबाबत सामना (सीएफटी) ह्यावरील महानिदेश दिले आहेत. आज दिलेल्या महा-निदेशांमध्ये, रिझर्व बँकेच्या निरनिराळ्या विभागांनी, ह्या विषयांवर आतापर्यंत दिलेल्या सूचना एकत्रित करण्यात आल्या आहेत आणि त्या तिच्या नियंत्रणाखालील सर्व संस्थांना लागु असतील. पार्श्वभूमी सप्टेंबर 29, 2015 रोजीच्या केलेल्या चौथ्या द्वैमासिक नाणेविषयक धोरण निवेदन 2015-16 मध्ये घोषित केलेल्या निर्णयानुसार, भारतीय रिझर्व बँकेने, जानेवारी 2016 पासून, अनुपालनात सुसुत्रता आणण्यासाठी, सर्व विनियामक बाबींवर महानिदेश देणे सुरु केले आहे. ह्या महानिदेशात बँकिंग सबंधीचे प्रश्न व विदेशी मुद्राव्यवहारांसह, निरनिराळ्या अधिनियमांखाली रिझर्व बँकेने तयार केलेले नियम व विनियम ह्यावरील सूचना समाविष्ट केलेल्या आहेत. महानिदेश देण्याची प्रक्रिया म्हणजे, प्रत्येक विषयासाठी, त्या विषयावरील सर्व सूचना समाविष्ट असलेला एकच महा-निदेश देणे. त्यामध्ये कोणतेही नियम, विनियम किंवा धोरणात बदल झाल्यास, तो त्याच वर्षी, परिपत्रके/वृत्तपत्र निवेदनांमार्फत कळविला जातो. नियम/विनियम किंवा धोरणांमध्ये एखादा बदल झाल्यास तो महा-निदेश त्याच वेळी व सुयोग्यतेने अद्यावत केला जातो. आवश्यक असेल तेव्हा, नियम व विनियमांबाबतची स्पष्टीकरणे, सहज समजता येणा-या भाषेतील नेहमी विचारल्या जाणा-या प्रश्नांच्या (एफएक्यु) स्वरुपात, तो महानिदेश दिल्यानंतर दिले जातील. निरनिराळ्या विषयांवर दिलेली विद्यमान महापरिपत्रके, ह्या विषयावर दिलेल्या महानिदेशांमुळे रद्दबातल होतील. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2014 |