<font face="mangal" size="3">कोविड-19 विनियामक पॅकेज - तणावयुक्त अॅसेट्सच्य&# - आरबीआय - Reserve Bank of India
कोविड-19 विनियामक पॅकेज - तणावयुक्त अॅसेट्सच्या द्रवीकरणावरील (रिझोल्युशन) प्रुडेंशियल साच्याखालील द्रवीकरण कालरेषांचे पुनरावलोकन
आरबीआय/2019-20/245 मे 23, 2020 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता); महोदय/महोदया, कोविड-19 विनियामक पॅकेज - तणावयुक्त अॅसेट्सच्या द्रवीकरणावरील (रिझोल्युशन) प्रुडेंशियल साच्याखालील द्रवीकरण कालरेषांचे पुनरावलोकन कृपया, तणावयुक्त अॅसेट्सच्या द्रवीकरणावरील प्रुडेंशियल साच्याखालील दि. जून 7, 2019 (‘प्रुडेंशियल साचा’) द्रवीकरण कालरेषांचा विस्तार ह्यावरील परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.62/21.04.048/2019-20 दि. एप्रिल 17, 2020 चा संदर्भ घ्यावा. तणावयुक्त अॅसेट्सच्या द्रवीकरणाबाबत सातत्याने असलेली आव्हाने विचारात घेऊन, वरील परिपत्रकातील अंशतः बदल करुन, गव्हर्नरांनी, मे 22, 2020 रोजी केलेल्या घोषणेनुसार ह्या कालरेषा खालीलप्रमाणे विस्तारित करण्यात आल्या आहेत. (2) मार्च 1, 2020 रोजी पुनरावलोकन कालावधीत असलेल्या खात्याबाबत, मार्च 1, 2020 ते ऑगस्ट 31, 2020 पर्यंतचा कालावधी, पुनरावलोकन कालासाठी 30 दिवसांची कालरेषा काढण्यासाठी/गणन करण्यासाठी वगळला जाईल. अशा सर्व खात्यांच्या बाबतीत, अवशिष्ट पुनरावलोकन कालावधी, सप्टेंबर 1, 2020 पासून सुरु होईल व तो समाप्त झाल्यानंतर धनकोंना द्रवीकरण करण्यासाठी नेहमीप्रमाणे 180 दिवस मिळतील. (3) पुनरावलोकन कालावधी समाप्त झाला होता परंतु मार्च 1, 2020 रोजी 180 दिवसांचा द्रवीकरण कालावधी समाप्त झाला नव्हता अशा खात्यांबाबत, तो 180 दिवसांचा कालावधी मूलतः समाप्त होण्याच्या तारखेपासून 180 दिवसांनी, द्रवीकरणाची कालरेषा वाढविली जाईल. (4) परिणामी, ह्या प्रुडेंशियल साच्यातील परिच्छेद 17 मध्ये विहित केलेल्या अतिरिक्त तरतुदी करण्याची आवश्यकता, वर दिलेला विस्तारित द्रवीकरण कालावधी संपल्यानंतरच विचारात घेतली जाईल. (5) एप्रिल 17, 2020 रोजीच्या परिपत्रकातील इतर तरतुदी लागु असणे सुरुच राहील. आपला विश्वासु, (सौरव सिन्हा) |