<font face="mangal" size="3">आरबीआयचे नाव असलेले क्रेडिट कार्ड :- आरबीआय ति& - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआयचे नाव असलेले क्रेडिट कार्ड :- आरबीआय तिच्या नावे केल्या जात असलेल्या नवीनतम् फसवणुकीबाबत सावधानतेचा इशारा देत आहे
21 नोव्हेंबर 2014 आरबीआयचे नाव असलेले क्रेडिट कार्ड :- आरबीआय तिच्या नावे केल्या जात असलेल्या नवीनतम् फसवणुकीबाबत सावधानतेचा इशारा देत आहे आरबीआयने आज, तिच्या नावाने सुरु केल्या गेलेल्या नवीनतम् फसवणुकीबाबत जनतेला आणखी एक सावधानतेचा इशारा देत आहे. फसवाफसवी करणा-या लोकांकडून, आरबीआयच्या नावाने दिलेले क्रेडिट कार्ड. ह्याबाबतची कार्यरीत सांगतांना रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले की, भोळ्या जनतेला असे एक क्रेडिट कार्ड पाठविले जाते की ज्याद्वारे, एखाद्या बँक खात्यातून कितीही छोटी असलेली परंतु एका मर्यादेपर्यंतची रक्कम काढता येते. अशा रितीने ग्राहकाचा विश्वास संपादन केल्यानंतर, ती लबाड व्यक्ती, सावजाला, त्याच खात्यात खूप मोठी रक्कम जमा करण्यास सांगते. पैसे जमा झाले की ते कार्ड काम करत नाही आणि त्यानंतर सावज बनलेल्या कार्डधारकाला त्या लबाड व्यक्तीकडून काहीही पत्ता लागत नाही. अशा फसवणुकीबाबत इशारा देताना, रिझर्व बँकेकडून पुनश्च सांगण्यात येत आहे की, भारताची एक केंद्रीय बँक म्हणून, ती, कोणत्याही व्यक्तीबरोबर, बचत खाते, चालु खाते, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँक सेवा मार्फत, किंवा विदेशी मुद्रा स्वीकारणे किंवा ठेवणे किंवा इतर कोणत्याही बँकिंग सेवेमार्फत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाही. इतर प्रकारच्या फसवणुकींची यादीही रिझर्व बँकेने तयार केली असून ती पुढीलप्रमाणे आहे (1) आरबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून, ई मेल किंवा फोन कॉल्स द्वारे, मोठ्या रकमांची बक्षिसे/लॉटरी इत्यादीच्या खोट्या ऑफर्स देणे. (2) ऑनलाईन व्यवहारांसाठी रिझर्व बँकेची खोटी वेबसाईट. (3) जनतेला, त्यांचा युजर आयडी/पासवर्ड इत्यादि सह, त्यांच्या बँक खात्याची माहिती शेअर करण्यासाठी, ई मेल मार्फत किंवा ई मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगणे. (4) ई मेल मार्फत, रिझर्व बँकेत नोकरी देण्याचे अमिष दाखविणे. रिझर्व बँकेकडून असेही सांगण्यात आले आहे की, अशा खोट्या ऑफर्स, आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ), आय कर प्राधिकरण, कस्टम्स प्राधिकरण ह्यासारख्या सार्वजनिक संस्थांच्या नावाने, किंवा गव्हर्नर डॉ. रघुराम राजन किंवा आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी ह्यासारख्या व्यक्तींच्या नावेही दिल्या जात आहेत. रिझर्व बँकेने निर्देशित केले आहे की, अशा लबाड लोकांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर ते परत मिळण्याची आशा अत्यंत कमी आहे. रिझर्व बँकेने जनतेला पुनश्च सावधानतेचा इशारा दिला आहे की, अशा ऑफर्सना बळी पडल्यामुळे, तुमची व्यक्तिगत व महत्वाची माहिती दिली जाते व तिचा दुरुपयोग केला गेल्यास त्यांची आर्थिक व इतर हानी होऊ शकते. त्यांच्याच हितासाठी, त्यांनी अशा ऑफर्सना कोणताही प्रतिसाद देण्यापासून दूर रहावे. त्याऐवजी, त्यांनी पोलिसांच्या सायबर गुन्हा शाखेकडे ताबडतोब तक्रार दाखल करावी. ह्याबाबतच्या संपर्काची माहिती, रिझर्व बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या प्रेस रिलीजमध्ये दिली आहे (विदेशामधून फसव्या ऑफर्सबाबत स्थानिक पोलिस/सायबर गुन्हे प्राधिकरणांना कळवा). अल्पना किल्लावाला वृत्तपत्रासाठी निवेदन : 2014 2015/1046 |