<font face="mangal" size="3">रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक - आरबीआय - Reserve Bank of India
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - दैनंदिन अहवाल पाठविणे
आरबीआय/2016-17/136 नोव्हेंबर 16, 2016 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - दैनंदिन अहवाल पाठविणे कृपया, वरील विषयावरील, डीसीएम सीओ परिपत्रक, डीसीएम(पीएलजी)क्र. 1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 च्या परिच्छेद (4) चा संदर्भ घ्यावा. त्यात, विहित बँक नोटांचा (एसबीएन) दैनिक अहवाल आरबीआयकडे पाठविण्यास बँकांना सांगण्यात आले होते. वरील अहवाल बँका, लक्षणीय विलंबाने पाठवत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, तपशीलवार माहितीचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आरबीआयमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. (2) ह्यासाठी बँकांना सांगण्यात येते की त्यांनी प्रत्येक दिवशी रात्री 11.00 वाजेपर्यंत दैनंदिन माहिती जोडपत्र 6ए मध्ये, आरबीआय, सीडीएम, सीओ ह्यांचेकडे ई-मेलने पाठवावी. आपली विश्वासु, (सुमन रे) |