<font face="mangal" size="3">बँकांद्वारे डिव्हिडंडची घोषणा</font> - आरबीआय - Reserve Bank of India
बँकांद्वारे डिव्हिडंडची घोषणा
आरबीआय/2021-22/23 एप्रिल 22, 2021 सर्व वाणिज्य बँका आणि सहकारी बँका, महोदय/महोदया, बँकांद्वारे डिव्हिडंडची घोषणा कृपया आमचे परिपत्रक डीओआर.बीपी.बीसी.क्र.29/21.02.067/2020-21 दि. डिसेंबर 4, 2020 व ह्या विषयावरील इतर संबंधित परिपत्रकांचा संदर्भ घ्यावा. (2) देशामधील कोविड-19 च्या सुरु असलेल्या दुस-या लाटेमुळे निर्माण झालेली अनिश्चितता विचारात घेता, बँकांनी स्थितिस्थापक राहणे व अनपेक्षित तोट्यांविरुध्दची तटबंदी म्हणून भांडवल उभे करणे व ते जतन करुन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्यासाठी इक्विटी शेअर्सवर डिव्हिडंड देण्यास बँकांना परवानगी देत असताना, मार्च 31, 2021 रोजी संपणा-या वर्षासाठी डिव्हिडंड घोषित करण्यासाठीच्या नॉर्म्सचे पुनरावलोकन करावयाचे खालीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे :- वाणिज्य बँका (3) परिपत्रक परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.88/21.02.067/2004-05 मे 4, 2005, च्या सूचनांमधील अंशतः बदलांनुसार, मार्च 31, 2021 रोजी संपणा-या वित्तीय वर्षासाठीच्या नफ्यामधून बँका, इक्विटी शेअर्सवर डिव्हिडंड देऊ शकतात - मात्र अशा डिव्हिडंडचा भाग हा, वरील परिपत्रकाच्या परिच्छेद 4 मध्ये विहित केलेल्या डिव्हिडंड पेआऊट रेशोनुसार निश्चित केलेल्या रकमेच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. मे 4, 2005 रोजीच्या परिपत्रकातील इतर सूचनांमध्ये कोणताही बदल नाही. सहकारी बँका (4) मार्च 31, 2021 रोजी संपणा-या वित्तीय वर्षाच्या नफ्यामधून, इक्विटी शेअर्सवर विद्यमान सूचनांनुसार डिव्हिडंड देण्याची परवानगी सहकारी बँकांना असेल. सर्वसाधारण (5) डिव्हिडंड प्रदान केल्यानंतर, लागु असलेल्या किमान विनियामक भांडवली आवश्यकता पूर्ण करणे सर्व बँका सुरुच ठेवतील. इक्विटी शेअर्सवरील डिव्हिडंड घोषित करताना, आर्थिक परिस्थिती व लाभक्षमता विचारात घेऊन, लागु असलेल्या भांडवली आवश्यकता व तरतुदींचा पुरतेपणा (अॅडेक्वसी) च्या तुलनेत, विद्यमान व प्रक्षेपित बँक भांडवलाची स्थिती विचारात घेण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असेल. आपली विश्वासु, (उषा जानकीरामन) |