RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78472480

दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय - एनआरएलएम) - आजीवन - व्याज द्रव्यसहाय्य योजना

आरबीआय/2016-17/42
एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.13/09.01.03/2016-17

ऑगस्ट 25, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक,
सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँका.

महोदय/महोदया,

दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय - एनआरएलएम) - आजीवन - व्याज द्रव्यसहाय्य योजना

कृपया, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) खालील व्याज द्रव्यसहाय्य योजनेवरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.19/09.01.03/2015-16 दि. जानेवारी 21, 2016 चा संदर्भ घ्यावा.

(2) भारत सरकारच्या, ग्रामीण विकास मंत्रालयाकडून मिळालेल्या, डीएवाय-एनआरएलएम खालील, व्याज द्रव्यसहाय्य योजनेवरील, 2016-17 सालासाठीची सुधारित मार्गदर्शक तत्वे, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका व खाजगी क्षेत्रातील 15 बँकांद्वारा (सोबत जोडलेल्या यादीनुसार) अंमलबजावणीसाठी ह्या सोबत जोडण्यात आली आहेत.

आपली विश्वासु,

(उमा शंकर)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत : वरीलप्रमाणे


महिला एसएचसीसाठी व्याज द्रव्यसहाय्य योजना - वर्ष 2016-17

(1) 250 जिल्ह्यांमधील, सर्व वाणिज्य बँका (केवळ सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील व प्रादेशिक ग्रामीण बँका) व सहकारी बँका ह्यांच्यासाठी, 2016-17 सालामध्ये, महिला एसएचजींना द्यावयाच्या कर्जावरील व्याज अर्थसहाय्य योजना

(1) रु. 3 लाख पर्यंतच्या कर्जावर दरसाल 7% दराने व्याज अर्थसहाय्यासाठी सर्व महिला एसएचजी पात्र असतील. विद्यमान येणे असलेल्या कर्जामध्ये, एसजीएसवाय खाली भांडवली अर्थसहाय्य (सबसिडी) मिळत असलेले महिला एसएचजी, ह्या योजनेखालील लाभ मिळविण्यास पात्र असणार नाहीत.

(2) 250 जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील सर्व महिला एसएचजींना 7% दराने कर्ज देणा-या वाणिज्य व सहकारी बँकांची यादी जोडपत्र 1 मध्ये दिली आहे.

(3) 2016-17 सालासाठी, सर्व वाणिज्य बँकांना, 5.5% एव्हढी कमाल मर्यादा ठेवून, आकारलेले सरासरी भारित व्याज (वित्तमंत्रालयाच्या वित्तसेवांनी, 2016-17 सालासाठी विहित केलेले डब्ल्युएआयसी - जोडपत्र 2) आणि 7% ह्यामधील फरकाच्या रकमेचे द्रव्य सहाय्य केले जाईल. मात्र हे द्रव्य सहाय्य, बँकांनी, 250 जिल्ह्यांमध्ये एसएचजींना दरसाल 7% दराने कर्जे दिली असण्याच्या अटींवरच सर्व बँकांना दिले जाईल.

(4) ह्याशिवाय, त्या एसएचजींनी त्वरित कर्जफेड केल्यास त्यांना 3% अतिरिक्त द्रव्यसहाय्य दिले जाईल. त्वरित कर्जफेड केल्यामुळे अतिरिक्त 3% व्याज द्रव्यसहाय्याबाबत, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) विहित केलेला पुढील निकष पूर्ण केला असल्यासच ते एसएचजी खाते त्वरित अदाकर्ता म्हणून समजले जाईल.

(अ) कॅश क्रेडिट लिमिटसाठी

(1) आऊटस्टँडिंग बॅलन्स हा, विहित केलेली मर्यादा/निकासीच्या रकमेपेक्षा सातत्याने 30 दिवसांपेक्षा अधिक काळ असू नये.

(2) त्या खात्यात नियमितपणे पैसे भरले व काढले जात असावेत. कोणत्याही परिस्थितीत, महिन्यामधून किमान एकदातरी ग्राहकाने पैसे जमा केले असावेत.

(3) ग्राहकाद्वारे जमा केलेली रक्कम, त्या महिन्यातील व्याज डेबिट करण्यास पुरेशी असावी.

(ब) मुदत कर्जांसाठी - कर्जाच्या मुदतीदरम्यान, व्याजाचे सर्व प्रदान/मुद्दलाचे सर्व हप्ते, ड्यु म्हणजे ठरविलेल्या/देय तारखेपासून 30 दिवसांच्या आत भरले गेले आहेत असे मुदत कर्ज खाते; त्वरित प्रदान खाते म्हणून समजले जावे.

भविष्य काळातही, त्वरित प्रदानासाठीची मार्गदर्शक तत्वे ही आरबीआयने त्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणे सुरुच राहील.

अहवाल पाठविण्याच्या तिमाहीच्या अखेरीस असलेली त्वरित प्रदान एसएचजी खाती, 3% अतिरिक्त व्याज-द्रव्य सहाय्यासाठी पात्र असतील. बँकांनी हे 3% चे व्याज द्रव्यसहाय्य त्यासाठी पात्र असलेल्या एसएचजी कर्ज खात्यात जमा करावे व त्यानंतर त्याची भरपाई/परतावा मागावा.

(5) ही योजना केवळ ग्रामीण भागातील महिला एसएचसींसाठीच मर्यादित आहे.

(6) ह्या योजनेसाठीचा निधी, डीएवाय-एनआरएलएम खाली केंद्रीय वाट्यामधून उपलब्ध केला जाईल.

(7) ह्या व्याजद्रव्य सहाय्य योजनेची अंमलबजावणी सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी, ग्रामीण विकास मंत्रालयाने (एमओआरडी) निवडलेल्या एका नोडल बँकेच्या मार्फत केली जाईल. एमओआरडीने सांगितल्याप्रमाणे, ही नोडल बँक, एका वेब आधारित मंचाद्वारे ही योजना कार्यान्वित करील. 2016-17 सालासाठी, एमओआयडीने, कॅनरा बँकेला नोडल बँक म्हणून नेमले आहे.

(8) कोअर बँकिंग सोल्युशन्स (सीबीएस) राबविणा-या सर्व बँका ह्या योजनेखालील व्याजद्रव्य सहाय्य मिळवू शकतात.

(9) 7% ह्या नियमित द्रव्य सहाय्य दराने, एसएचजींना दिलेल्या कर्जावरील व्याज द्रव्यसहाय्य मिळविण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांनी, एसएचजीच्या कर्ज खात्याची माहिती, नोडल बँकेच्या पोर्टलवर आवश्यक त्या तांत्रिक निकषांसह अपलोड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही, 3% अतिरिक्त व्याज-द्रव्यसहाय्याबाबतचे दावे त्याच पोर्टलवर टाकावेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांचे नियमित दावे (डब्ल्युएआयसी किंवा कर्जदर व 7% ह्यामधील फरक अशी त्वरित प्रदानावरील अतिरिक्त 3%) तिमाही धर्तीवर, जून 30, 2016, सप्टेंबर 30, 2016, डिसेंबर 31, 2016 व मार्च 31, 2017 रोजी असल्यानुसार पुढील महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सादर करावेत.

(10) एसएचजींना दिलेल्या कर्जावरील 7% व्याज द्रव्यसहाय्य व 3% एवढे अतिरिक्त द्रव्यसहाय्याचे दावे मिळविण्यासाठी, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी, नोडल बँकेकडे, तिमाही धर्तीवर दाव्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही बँकेने सादर केलेल्या दाव्यांसोबत, द्रव्यसहाय्य खरे व योग्य असल्याचे प्रमाणपत्र (मूळ प्रत) सादर केले जावे (जोडपत्र 3 ते 5), मार्च 2017 अखेरीसच्या तिमाहीच्या द्राव्यांची तडजोड, त्या बँकेने 2016-17 ह्या संपूर्ण वर्षासाठी, स्टॅट्युटरी ऑडिटरने दिलेले प्रमाणपत्र मिळाल्यावर, एमओआरडीकडून केली जाईल.

(11) 2016-17 सालामध्ये केलेला परंतु त्या वर्षात समाविष्ट न केलेला एखादा दावा. सार्वजनिक क्षेत्रातील व खाजगी क्षेत्रातील बँकांनी, तो दावा खरा असल्याबाबतचे, स्टॅट्युटरी ऑडिटरचे प्रमाणपत्र जोडून, ‘अतिरिक्त दावा’ असे लिहून, उशिरात उशिरा जून 30, 2017 पर्यंत वेगळ्याने सादर केला जावा.

(12) बँकांनी त्यांच्या दाव्यांमधील दुरुस्त्या, ऑडिटरच्या प्रमाणपत्रावर आधारित त्यानंतरच्या दाव्यांमध्ये समायोजित केल्या जातील. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी ह्या दुरुस्त्या नोडल बँकेच्या पोर्टलवरच असाव्यात.

II. वर्ग 2 जिल्ह्यांसाठी (250 जिल्हे सोडून) व्याज द्रव्यसहाय्य योजना

वरील 250 जिल्हे सोडून, वर्ग 2 जिल्ह्यांसाठी, डीएवाय-एनआरएलएम खालील सर्व महिला एसएचजी गट, 7% व्याजदराने कर्ज सुविधा मिळविण्यास, व्याज द्रव्यसहाय्य मिळविण्यास पात्र असतील. ह्या द्रव्य सहाय्यासाठीचा निधी, डीएवाय-एनआरएलएम साठी ठेवलेल्या रकमेतून राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (एसआरएलएम) कडे उपलब्ध केला जाईल. वर्ग 2 जिल्ह्यांमध्ये, बँका त्यांच्या कर्ज देण्याच्या निकषांनुसार एसएचजींवर आकार लावतील, आणि कर्ज देण्याचा दर व 7% ह्यामधील आ.व. 2016-17 साठी असलेला फरक (कमाल मर्यादा 5.5%), एसआरएलएमद्वारा, त्या एसएचजींच्या कर्ज खात्यांमध्ये द्रव्यसहाय्य करुन भरुन काढला जाईल. ह्याला अनुसरुन, 2016-17 सालासाठी, वर्ग 2 जिल्ह्यांसाठी व्याज-द्रव्यसहाय्याच्या मार्गदर्शक तत्वांची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे असतील :-

(अ) बँकांची भूमिका

कोअर बँकिंग सिस्टिम (सीबीएस) कार्यरत करणा-या बँकांनी, सर्व जिल्ह्यांमधील एसएचजींना दिलेल्या व देणे शिल्लक असलेल्या कर्जांची माहिती, एमओआरडीने सुचविलेल्या नमुन्यामध्ये, थेट सीबीएस मंचावरुन, ग्रामीण विकास मंत्रालयाला (एफटीपी मार्फत) व एसआरएलएमना कळविणे आवश्यक आहे. एसएचजींना वाटप करावयाच्या व्याज द्रव्यसहाय्याचे गणन व वाटप करण्यास मदत होण्यासाठी ही माहिती मासिक धर्तीवर दिली जावी.

(ब) राज्य सरकारांची भूमिका

डीएवाय - एनआरएलएम खाली सर्व महिला एसएचजी, एसएचजी म्हणूनच समजल्या जातात आणि त्वरित परतफेड केल्यास, रु. 3 लाख पर्यंतच्या कर्जासाठी 7% दराने, त्या व्याजद्रव्यसहाय्यास पात्र आहेत.

(2) ह्या योजनेची अंमलबजावणी राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांच्या (एसआरएलएम) द्वारा केली जाईल. वाणिज्य व सहकारी बँकांकडून कर्ज मिळविलेल्या व पात्र असलेल्या एसएचजींना, एसआरएलएम व्याज द्रव्यसहाय्य उपलब्ध करुन देईल. ह्या द्रव्यसहाय्यासाठीचा निधी, भारत सरकारच्या निकषांनुसार, केंद्रीय वाटप व राज्य सरकारची वर्गणी ह्यामधून भागविला जाईल.

(3) 2016-17 सालासाठी बँकांचा कर्ज देण्याचा दर व 7% ह्यामधील फरक (कमाल मर्यादा 5.5%), थेट मासिक/तिमाही धर्तीवर एसआरएलएमद्वारा एसएचजींना दिला जाईल. ज्यांनी त्वरित परतफेड केली आहे अशा एसएचजींच्या कर्ज खात्यांमध्ये, एसआरएलएम द्वारे, द्रव्यसहाय्याची रक्कम ई-ट्रान्स्फरमार्फत जमा केली जाईल.

(4) व्याजद्रव्यसहाय्य करण्यासाठी, आरबीआयने विहित केलेले पुढील निकष पूर्ण केलेले असल्यास ते खाते त्वरित प्रदानकर्ता म्हणून समजले जाईल :

(अ) कॅश क्रेडिट मर्यादेसाठी

(1) आऊटस्टँडिंग शिल्लक सतत तीस दिवसांपेक्षा अधिक काळासाठी लिमिट/निकासी मर्यादेपेक्षा जास्त नसावी.

(2) त्या खात्यात नियमितपणे जमा व निकासी होत रहावी. कोणत्याही परिस्थितीत, महिन्यातून एकदातरी ग्राहकाने पैसे जमा करावेत.

(3) ग्राहकाने जमा केलेली रक्कम त्या महिन्यात वजा केलेल्या व्याजासाठी पुरेशी असावी.

(ब) मुदत कर्जांसाठी : त्या कर्जाच्या मुदतीमध्ये, व्याजाचे सर्व हप्ते/मुद्दलाचे हप्ते देय तारखेपासून 30 दिवसांच्या आत अदा केले गेले आहेत अशा मुदत कर्ज खात्याला त्वरित प्रदान खाते समजले जाईल. भविष्यकाळातही, ह्या विषयावर आरबीआयने दिलेल्या त्वरित प्रदानाबाबतची मार्गदर्शक तत्वे लागु असणे सुरुच राहील.

(5) विद्यमान कर्जांमध्ये एसजीएसवाय खाली भांडवली अर्थसहाय्य मिळविलेल्या महिला एसएचजी, ह्या योजनेखाली, घेतलेल्या कर्जासाठी व्याज द्रव्यसहाय्याचा लाभ घेण्यास पात्र नसतील.

(6) एसआरएलएमनी, पात्र असलेल्या एसएचजींच्या कर्ज खात्यात हस्तांतरित केलेल्या द्रव्यसहाय्याच्या रकमा दर्शविणारे, तिमाही उपयोजिता प्रमाणपत्र सादर करावे.

III. राज्य-विशिष्ट अशा व्याज द्रव्यसहाय्य योजना राबविणा-या राज्यांनी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचा समन्वय केंद्रीय योजनेशी करण्यास सांगण्यात येत आहे.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?