<font face="mangal" size="3">विहित बँक नोटा (एसबीएन) जमा करणे - चेस्ट बॅलन्स  - आरबीआय - Reserve Bank of India
विहित बँक नोटा (एसबीएन) जमा करणे - चेस्ट बॅलन्स मर्यादा/रोकड धारण मर्यादा
आरबीआय/2016-17/226 फेब्रुवारी 13, 2017 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, विहित बँक नोटा (एसबीएन) जमा करणे - चेस्ट बॅलन्स मर्यादा/रोकड धारण मर्यादा कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी) क्र.1459/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 29, 2016 च्या परिच्छेद 2(2) चा संदर्भ घ्यावा. त्यात निर्देशित केल्याप्रमाणे एक आढावा घेण्यात आला आणि असे ठरविण्यात आले की, पुढील सूचना मिळेपर्यंत, नोव्हेंबर 10, 2016 पासून धन कोषामध्ये जमा करण्यात आलेल्या एसबीएनना, मळलेल्या नोटांचा चेस्ट बॅलन्स म्हणूनच समजण्यात येईल. परंतु अशा जमा केलेल्या रकमा, चेस्ट बॅलन्स मर्यादा/रोकड धारण मर्यादा काढण्यासाठी हिशेबात घेतल्या जाणार नाहीत. आपला विश्वासु, (एस. राय) |