RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

136332802

अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदरांचे विनियमन (डि-रेग्युलेशन)

आरबीआय/2013-14/488
आरपीसीडी सीओ आरआरबी.आरसीबी.बीसी क्र.85/03.05.33/2013-14

फेब्रुवारी 11, 2014

सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका/
राज्य/केंद्र सहकारी बँका

महोदय/महोदया,

अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदरांचे विनियमन (डि-रेग्युलेशन)

कृपया आमची परिपत्रके आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.बीसी क्र.65/03.05.33/2013-14, आणि आरपीसीडी सीओ आरआरबी.आरसीबी.बीसी क्र.68/07.51.014/2013-14, दि. डिसेंबर 2, 2013 चा संदर्भ घ्यावा. त्यात, प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) आणि राज्य/केंद्रीय सहकारी बँका (एसटीसीबी/सीसीबी) ह्यांना सांगण्यात आले होते की, 3 वर्षांच्या परिपक्वतेच्या, वाढत्या एनआरई ठेवींवर, कोणत्याही मर्यादेशिवाय व्याजदर देण्याबाबतचे स्वातंत्र्य (सीआरआर/एसएलआर च्या आवश्यकतांबाबत, अशा ठेवींवर दिलेल्या सुटीचा लाभ देण्यासाठी) जानेवारी 31, 2014 पर्यंत वाढविण्यात आले आहे - मात्र त्यासाठी पुनरावलोकन केले जाण्याची अट आहे.

(2) ह्याचे पुनरावलोकन केल्यावर आणि आरआरबी/एसटीसीबी/सीसीबी ह्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी, अशी सुविधा फेब्रुवारी 28, 2014 पर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे. मार्च 1, 2014 पासून, व्याजदरावरील मर्यादा, आरआरबींसाठी ऑगस्ट 19, 2013 पूर्वीच्या स्थितीवर, तर एसटीसीबी/सीसीबींसाठी ती मर्यादा ऑगस्ट 22, 2013 पूर्वीच्या स्थितीवर असेल. म्हणजेच, एनआरई ठेवींवर बँकांनी देऊ केलेले व्याजदर, देशांतर्गत अशा समतुल्य रुपये ठेवींवर, त्या बँका देत असलेल्या व्याजदरांपेक्षा अधिक असू शकत नाहीत

(3) ह्याबाबत वेळोवेळी सुधारित केलेल्या सर्व सूचना लागु असणे सुरुच राहील.

(4) सुधारित निदेश आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.क्र. 86/03.05.33/2013-14.-दि. फेब्रुवारी 11, 2014 सोबत जोडले आहेत.

आपला,

(ए. उद्गाता)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक.


आरपीसीडी.सीओ.आरआरबी.आरसीबी.डीआयआर.क्र.86/03.05.33/2013-14

फेब्रुवारी 11, 2014

अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदरांचे निर्नियमन (डि-रेग्युलेशन)

बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 च्या कलम 35 ए ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, आणि अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदरांचे निर्नियमन वरील निदेश, आरपीसीडी.सीओ.आरआरबी.डीआयआर.क्र.66/03.05.33/2013-14 आणि आरपीसीडी.सीओ.आरसीबी.डिआयआर.क्र.67/07.51.014/2013-14 दि. डिसेंबर 2, 2013 मधील बदलांनुसार, तसेच जनहिताच्या दृष्टीने असे करणे आवश्यक असण्याबाबत समाधान झाल्याने, रिझर्व बँक येथे निदेश देत आहे की, आरआरबींसाठी असलेला निदेश - आरपीसीडी.सीओ.आरआरबी.डीआयआर.क्र.23/03.05.33/2013-14 दि. ऑगस्ट 19, 2013 व एसटीसीबी/सीसीबीसाठी असलेला निदेश आरपीसीडी.सीओ.आरसीबी.डिआयआर.क्र.25/07.51.014/2013-14 दि. ऑगस्ट 22, 2013 मध्ये दिलेल्या सूचना, फेब्रुवारी 28, 2013 पर्यंत लागु होणे सुरुच राहील. मार्च 01, 2014 पासून मार्च 1, 2014 पासून, व्याजदरावरील मर्यादा, आरआरबींसाठी ऑगस्ट 19, 2013 पूर्वीच्या स्थितीवर, तर एसटीसीबी/सीसीबींसाठी ती मर्यादा ऑगस्ट 22, 2013 पूर्वीच्या स्थितीवर असेल. म्हणजेच, एनआरई ठेवींवर बँकांनी देऊ केलेले व्याजदर, देशांतर्गत अशा समतुल्य रुपये ठेवींवर, त्या बँका देत असलेल्या व्याजदरांपेक्षा अधिक असू शकत नाहीत.

डॉ. (श्रीमती) दीपाली पंत जोशी
कार्यकारी संचालक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?