<font face="mangal" size="3"> थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना - अंमलबजावणी</font> - आरबीआय - Reserve Bank of India
थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना - अंमलबजावणी
आरबीआय/2019-20/40 ऑगस्ट 13, 2019 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व सीईओ - अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना - अंमलबजावणी कृपया, सामाजिक कल्याण लाभांचे, लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यास मदत करण्यासाठी आधारच्या वापरासंबंधीचे आमचे परिपत्रक आरपीसीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.75/02.01.001/2012-13 दि. मे 10, 2013 व आरपीसीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.11/02.01.001/2013-14 दि. जुलै 9, 2019 चा संदर्भ घ्यावा. (2) ह्या संदर्भात बँकांना सांगण्यात येते की त्यांनी, खाती उघडणे, आणि सामाजिक कल्याण योजनांखाली पात्रतापूर्ण लाभार्थींच्या थेट लाभ हस्तांतरणासाठी (डीबीटी) उघडण्यात आलेल्या विद्यमान किंवा नवीन खात्यांमध्ये आधार क्रमांक जोडणे/नोंदण्याचे काम, महानिर्देश - तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश 2016, (मे 29, 2019 रोजी अद्यावत केल्यानुसार) च्या कलम 16 खालील तरतुदींनुसार व प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (पीएमएल) नियमावलीच्या विद्यमान तरतुदींना अनुसरुन करावे. (3) वरील मार्गदर्शक तत्वे, ‘थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना - बँक खात्यांमध्ये आधार क्रमांक नोंदवणे – स्पष्टीकरण’ ह्यावरील परिपत्रक एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.17/02.01.001/2015-16 दि. जानेवारी 14, 2016 रद्द करुन त्याजागी देण्यात आले आहे. आपला, (गौतम प्रसाद बोराह) |