RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78517510

शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेले निर्देश – मुदतवाढ

ऑक्टोबर 25, 2019

शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेले निर्देश – मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दि. मे 3, 2019 अन्वये शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना मे 4, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जाते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, निर्देश दि. ऑक्टोबर 18, 2019 अन्वये, वरील निर्देश, वरील बँकेला पुनरावलोकनाच्या अटीवर दि. मे 4, 2020 पर्यंत लागु असतील.

वरील मुदतवाढ असलेल्या निर्देशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

वरील मुदतवाढ आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1029

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?