बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटीना यथालागू), कलम 35 ए अंतर्गत निर्देश - शिवजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र
1 मे 2020 बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटीना यथालागू), भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 03 मे 2019 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-14/12.22.254/2018-19 च्या अनुषंगाने शिवजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र वर दिनांक 04 मे 2019 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. 2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए चे उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 24 एप्रिल 2020 च्या सुधारित निर्देश सं. DOR.CO.AID.No.D-77/12.22.254/2019-20 द्वारा दिनांक 04 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल. 3. वरील सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे. 4. उपरोक्त दिशानिर्देशच्या मुदत वाढीमुळे आणि / किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2301 |
पेज अंतिम अपडेट तारीख: