RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78524154

शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निर्देश - मुदतवाढ

मे 20, 2019

शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निर्देश - मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने (निर्देश दि. मे 18, 2018 अन्वये) शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना, मे 19, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक निर्देश देते की, निर्देश दि. मे 13, 2019 अन्वये, वरील निर्देश त्या बँकेला आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे ऑगस्ट 19, 2019 पर्यंत लागू असतील.

वरील मुदतवाढ दिली असलेल्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

एन. षण्मुगराम
सहाय्यक महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2718

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?