RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78520114

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 A अंतर्गत निर्देश- दि सीकेपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

31 जानेवारी 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 A अंतर्गत निर्देश-
दि सीकेपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निर्देश सं. UBD.CO.BSD.I. No.D-34/12.22.035/2013-14 च्या अनुषंगाने दि सीकेपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 2 मे 2014 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 25 ऑक्टोबर 2019 च्या सुधारित निर्देश सं DCBR.CO.AID/No.D-33 /12.22.035/2019-20 अनुसार 31 जानेवारी 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निर्देश सं. UBD.CO.BSD.I.No.D-34/12.22.035/2013-14 व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशाचा वैधता कालावधी जो दिनांक 31 जानेवारी 2020 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 29 जानेवारी 2020, च्या सुधारित निर्देश सं. DoR.CO.AID/No.D-52/12.22.035/2019-20 द्वारा दिनांक 01 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत दोन महिन्यांसाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 29 जानेवारी 2020 च्या सुधारित निर्देश सं. DoR.CO.AID/No.D-52/12.22.035/2019-20 याची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

4.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी : 2019-2020/1851

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?