RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78520086

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - मराठा सहकारी बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

डिसेंबर 30, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - मराठा सहकारी बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

मराठा सहकारी बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय.क्र.डी-4/12.22.141/2016-17 दि. ऑगस्ट 31, 2016 अन्वये, ऑगस्ट 31, 2016 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशांन्वये वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व त्यातील शेवटचे निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी.क्र.डी-20/12.22.140/2019-20 दि. सप्टेंबर 25, 2019 असून ते निर्देश पुनरावलोकनाच्या अटीवर, डिसेंबर 31, 2019 पर्यंत वैध होते.

(2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला देण्यात आलेले, वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून डिसेंबर 31, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-4/12.22.141/2016-17 दि. ऑगस्ट 31, 2016 निर्देश डीओआर.सीओ.एआयडी./क्र.डी-43/12.22.140/2019-20 दि. डिसेंबर 20, 2019 अन्वये, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे जानेवारी 1, 2020 ते मार्च 31, 2020 पर्यंत लागु असतील.

(3) संदर्भित निर्देशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ कळविणा-या डिसेंबर 20, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

(4) भारतीय रिझर्व बँकेने केलेली मुदतवाढ/बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1543

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?