RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78512268

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए अंतर्गत निर्देश-कर्नाळा नागरी सहकारी बँक लि. पनवेल, जिल्हा – रायगड, महाराष्ट्र

15 जून 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए अंतर्गत निर्देश-
कर्नाळा नागरी सहकारी बँक लि. पनवेल, जिल्हा – रायगड, महाराष्ट्र

याद्वारे जनतेच्या माहितीसाठी हे अधिसूचित करण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस) चे कलम 56 सह वाचन करता, कलम 35 ए उपकलम (1), च्या अन्वये, आपणाकडील निहित अधिकारांचा वापर करून दिनांक 15 जून 2020 च्या निर्देश सं DoS.CO.UCBs-West/D-1/12.07.157/2019-20 अनुसार कर्नाळा नागरी सहकारी बँक लि. पनवेल, जिल्हा – रायगड, महाराष्ट्र, या बॅकेला काही निर्देश जारी केले आहेत, ज्यायोगे दिनांक 15 जून 2020 रोजी व्यवसायिक कामकाज संपल्यापासून, प्रशासक, वरील बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही कर्जाचे आणि अग्रिम रकमांचे पुर्ननवीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही, निधी उसने घेणे आणि नव्या ठेवी स्वीकारणे यासहित कोणतीही देयता निर्माण करणार नाही, देयता किंवा बंधन निभावण्यासाठी किंवा अन्यथा, कोणतीही प्रदाने वितरित करणार नाही किंवा वितरित करण्याचे मान्य करणार नाही किंवा कसल्याही तडजोडीत किंवा व्यवस्थेत प्रविष्ट होणार नाही, किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक 15 जून 2020 च्या या निर्देशामध्ये अधिसूचित असल्याखेरीज आपल्या कोणत्याही म़ालमत्तांची किंवा मत्तांची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यप्रकारे विल्हेवाट लावणार नाही. उपरोक्त दिनांक 15 जून 2020 च्या निर्देशाची ची प्रत जनतेतील इच्छुकांना पाहण्यासाठी बँकेच्या वास्तूवर लावण्यात आलेली आहे. विशेषत: सर्व ठेवीदाराना त्यांच्या बचत खाते, चालू खाते किंवा इतर ठेवीचे कोणतेही खाते अशा सर्व खात्यांमधून जमा असलेल्या एकूण रकमेपैकी 500/- (रूपये पाचशे फक्त) पेक्षा जास्त नसलेली रककम उपरोक्त खातेदारास काढता येईल.

2. भारतीय रिझर्व्ह बँक व्दारा निर्गमित वरील निर्देश म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे, असा त्यांचा अर्थ घेतला जाऊ नये. आपली वित्तीय स्थिती सुधारेपर्यंत ऊपरोक्त बँक या निर्बंधांसहित आपला बँकिंग व्यवसाय करणे सुरुच ठेवील. परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँक विचार करील.

3. हे दिशानिर्देश दिनांक 15 जून 2020 च्या व्यवसायाच्या कामकाजाच्या समाप्तीपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील आणि त्या पुनरावलोकनाच्या अधीन असतील.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2501

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?