<font face="mangal" size="3">बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 अ अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार- मराठा सहकारी बॅंक लि., मुंबई, महाराष्ट्र
30 जुलै 2020 बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 अ अंतर्गत निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिनांक 31 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-1/D-4/12.22.141/2016-17 च्या अनुषंगाने मराठा सहकारी बॅंक लि., मुंबई, महाराष्ट्र वर दिनांक 31 ऑगस्ट 2016 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महिन्यांसाठी दिशानिर्देश लादण्यात आले होते. वरील निर्देशाची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आली होती ज्यामधे शेवटी दिनांक 18 मार्च 2020 रोजी दिलेल्या निर्देशित सं. DOR.CO.AID.No.D-62/12.22.140/2019-20 च्या अनुषंगाने दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती. 2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 अ, उप कलम (1) अनुसार,आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून उपरोक्त बँकेला असा आदेश देत आहे की दिनांक 31 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-1/D-4/12.22.141/2016-17 च्या अनुषंगाने मराठा सहकारी बँक लि., मुंबई, वर दिनांक 31 ऑगस्ट 2016 रोजी जे दिशानिर्देश लादण्यात आले होते त्याची वैधता वेळोवेळी संशोधित केली होती ज्यामध्ये शेवटी 31 जुलै 2020 पर्यंत ती वाढवण्यात आली होती जी की आता पुन्हा दिनांक 27 जुलै 2020 च्या सुधारित निर्देश सं. DOR.CO.AID.No.D-7/12.22.140/2020-21 द्वारा 01 ऑगस्ट 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत पाच महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे आणि ती पुनरावलोकनाधीन असेल. 3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. 4. दिनांक 27 जुलै 2020 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे. 5. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी: 2020-2021/115 |