RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78519943

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 अ अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार - दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र

15 एप्रिल 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 अ अंतर्गत निर्देश
कालावधी विस्तार - दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-1/D-5/12.22.039/2017-18 च्या अनुषंगाने सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र वर दिनांक 17 एप्रिल 2018 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महिन्यांसाठी दिशानिर्देश लादण्यात आले होते. वरील निर्देशाची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आली होती ज्यामधे शेवटी दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेल्या निर्देशित सं. DCBR.CO.AID.No.D-27/12.22.039/2019-20 च्या अनुषंगाने दिनांक 17 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून उपरोक्त बँकेला असा आदेश देत आहे की दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-1/D-5/12.22.039/2017-18 च्या अनुषंगाने सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, वर दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी जे दिशानिर्देश लादण्यात आले होते त्याची वैधता वेळोवेळी संशोधित केली होती ज्यामधे शेवटी दिनांक 17 एप्रिल 2020 पर्यंत ती वाढवण्यात आली होती जी की आता पुन्हा दिनांक 07 एप्रिल 2020 च्या सुधारित निर्देश सं. DOR.CO.AID.No.D-68/12.22.039/2019-20 द्वारा दिनांक 17 अप्रैल 2020 ते दिनांक 16 जुलै 2020 पर्यंत तीन महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे आणि ती पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत.

4. दिनांक 07 एप्रिल 2020 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

5. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2220

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?