<font face="mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित क&# - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निदेश - रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र - मुदतवाढ
ऑगस्ट 31, 2021 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निदेश - रुपी सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने, निदेश युबीडी.सीओ.बीएसडी-आय/डी-28/12.22.2018/2012-13 दि. फेब्रुवारी 21, 2013 अन्वये, रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना, फेब्रुवारी 22, 2013 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निदेशांखाली ठेवले होते. ह्या निदेशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती. व शेवटून ती ऑगस्ट 31, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. (2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या, पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निदेश देते की, निदेश डीओआर.एमओएन/डी-31/12.22.218/2021-22 दि. ऑगस्ट 27, 2021 अन्वये, वरील निदेश, त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर नोव्हेंबर 30, 2021 पर्यंत लागु असतील. (3) संदर्भित निदेशाच्या इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ घोषित करणा-या दि. ऑगस्ट 27, 2021 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. (4) भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी : 2021-2022/780 |